RR vs GT IPL 2024 : पराभवासोबतच संजूला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

Sanju Samson Fined News : राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Sanju Samson Fined
Sanju Samson Fined After RR vs GT Match IPL 2024 News Marathisakal
Updated on

Sanju Samson Fined After RR vs GT Match IPL 2024 : राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने या मोसमातील पहिले चार सामने शानदारपणे जिंकले होते, तर पाचव्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर 3 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.

या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे त्याला बीसीसीआयकडून लाखो रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 196 धावा केल्या, तर गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला.

Sanju Samson Fined
RR vs GT : राशिद अन् राहुल! दोन RR अन् 2 षटकात बाजी पलटली, सामन्याचा हिरोच ठरला व्हिलन?

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघ आपली 20 षटके वेळेवर पूर्ण करू शकला नाही, ज्यामुळे शेवटच्या षटकात 30-यार्ड सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी फक्त 4 क्षेत्ररक्षक उभे करता आले. सामना संपल्यानंतर संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटच्या चुकीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 12 लाखांचा दंड ठोठावला.

संथ ओव्हर रेटमुळे राजस्थान रॉयल्स संघाची या मोसमातील ही पहिली चूक आहे आणि त्यामुळेच संजू सॅमसनला हा दंड सोसावा लागला आहे. संजू व्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंनाही चुकीसाठी दंड ठोठावण्यात येणार आहे.

Sanju Samson Fined
ICC World Cup 2027 : शिक्कामोर्तब! क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; 'या' आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

पावसामुळे हा सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला. राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली, त्यानंतर त्यांनी 42 धावांपर्यंत दोन्ही सलामीचे फलंदाज गमावले. येथून कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली. या सामन्यात संजूने 38 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर संजू आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये या हंगामात आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 246 धावा झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.