T20 WC 2024 Team India : गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनं वाढवलं बीसीसीआयचं टेन्शन; बुमराह सोडला तर सर्व वेगवान गोलंदाज...

Ajit Agarkar
T20 WC 2024 Team Indiaesakal
Updated on

T20 WC 2024 Team India Squad : आयपीएलचा 17 वा हंगाम झाल्या झाल्या भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहे. सध्या बीसीसीआयची निवडसमिती संघ नविडीच्या तयारीत आहे. मात्र हंगमातील आतापर्यंतच्या 40 सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसात निवडसमिती सदस्यांची बैठक होणार आहे. यात भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ निवडला जाणार आहे. निवडसमितीसमोर फलंदाजीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

फिरकीपटू देखील चांगली कामगिरी करत असल्याने त्यांचे देखील पर्याय निवडसमितीसमोर आहेत. मात्र निवडसमितीची डोकेदुखी वेगवान गोलंदाजांनी वाढवली आहे. जसप्रीत बुमराहचा अपवाद सोडला तर इतर वेगवान गोंदाजांनी आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सुमार कामगिरी केली आहे.

Ajit Agarkar
IPL 2024 : षटकार-चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर ऋषभ पंतला मागावी लागली माफी! धक्कादायक कारण आले समोर

वेगवान गोलंदाजी आक्रमण हाच सध्याचा एकमेव विभाग आहे जो चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएल 2024 मधील कामगिरी पाहिल्यास, भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये केवळ बुमराहचाच प्रभावी विक्रम आहे, तर इतर वेगवान गोलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. बुमराहने आठ सामन्यांमध्ये 6.37 च्या इकॉनॉमी रेटने 13 बळी घेतले आहेत आणि वेगवान गोलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. आयपीएलपूर्वी, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद सिराज बुमराहला नव्या चेंडूने सपोर्ट करेल, असे मानले जात होते.

पण त्याचा इकॉनॉमी रेट 9.41 आहे यावरून तो किती महागडा ठरतोय हे दिसून येंत. एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून टी-२० विश्वचषकासाठी तो पुनरागमन करणं कठीण आहे.

Ajit Agarkar
Team India Squad T20 WC24 : राजधानीत वादळ! 8 षटकार 5 चौकाराचा कमाल, टी-20 वर्ल्ड कपसाठी 'या' खेळाडूचे अमेरिकेचे तिकीट बुक

नव्या गोलंदाजांना मिळणार संधी?

नियमित वेगवान गोलंदाज प्रभावी कामगिरी करत नसल्यामुळे निवड समिती आणखी काही वेगवान गोलंदाजांवर लक्ष ठेवणार का? टी. नटराजनने सनरायझर्स हैदराबादसाठी चांगली कामगिरी केली आहे आणि पाच सामन्यांमध्ये 8.50 च्या इकॉनॉमीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने चांगले यॉर्कर बॉलही टाकले आहेत. याशिवाय अलीकडेच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पाच बळी घेण्याचा पराक्रम करणारा संदीप शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

त्याने तीन सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत. मोहसिन खान, तुषार देशपांडे, यश ठाकूर, मयंक यादव आणि हर्षित राणा यांसारख्या गोलंदाजांवरही निवडकर्ते लक्ष घालतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. T20 विश्वचषकासाठी सर्वोत्कृष्ट 15 खेळाडूंची निवड येत्या काही दिवसांत होणार आहे, मात्र भारताचा आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा असेल तर वेगवान गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करावी लागेल.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.