IPL 2023 Ben Stokes : आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या जाणार आहे. चेन्नई संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने 11 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता चेन्नईसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू आयपीएल 2023 च्या मध्यभागी जखमी झाला होता. गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असला तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे. सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी म्हणाले की, मला खात्री आहे की स्टोक्स निवडीसाठी उपलब्ध आहे, परंतु प्रथम संघाच्या संतुलनाचा प्रश्न येतो.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडूला चेन्नईने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु तो आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही. 2 सामन्यात त्याने 8 धावा केल्या आणि यानंतर तो जखमी झाला. त्याने आयपीएलमध्ये एकूण 45 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 935 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्सची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने एकट्याने इंग्लंडला टी-20 विश्वचषक 2022 आणि एकदिवसीय विश्वचषक 2019 जिंकले आहे.
आयपीएल 2023 मध्ये CSKच्या संघाने आतापर्यंत 11 सामने जिंकले आहेत, त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्यांना 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
दिल्ली विरुद्ध चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक चहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष टेकशाना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.