IPL 2023 MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकिर्दीत सर्व काही साध्य केले आहे. आयपीएलमध्येही धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली 4 वेळा सीएसकेला ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर सीएसकेच्या संघाला धोनीनंतर नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे.
महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स भविष्यात CSK कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकेल, असा विश्वास अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने व्यक्त केला आहे.
इंग्लंडच्या या अनुभवी खेळाडूने सांगितले की, स्टोक्सशिवाय ऋतुराज गायकवाडमध्येही भविष्यात संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च्या खेळाडूंच्या लिलावात स्टोक्सवर 16.25 कोटी रुपये खर्च केले, हे दर्शविते की फ्रँचायझी धोनीचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून विश्वचषक विजेत्या अष्टपैलू खेळाडूकडे लक्ष देत आहे.
ईएसपीएन-क्रिकइन्फोनुसार, वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोईन त्याचा इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सबद्दल म्हणाला की, तो आयपीएलमध्ये खेळण्याचा खरोखर आनंद घेत आहे. चेन्नई सुपर किंग्स ही अशीच एक फ्रँचायझी आहे जिथे तुम्ही स्वतः परिस्थितीचा आनंद घेत राहता आणि या फ्रँचायझीसाठी खेळणे तुम्हाला खरोखर आवडते. स्टोक्स त्याच्या अनुभवामुळे संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे.
मोईन पुढे म्हणाला की, बेन स्टोक्स भविष्यात CSK कर्णधारपदाची धुरा सांभाळू शक्यता कारण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एमएस आता संघाचे नेतृत्व करत असून तो काही काळ कर्णधार असेल. भविष्यात कर्णधारासाठी आमच्याकडे आणखी काही पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. ऋतुराज हा हुशार खेळाडू आहे ज्याला जबाबदारी घ्यायला आवडते. फ्रँचायझीला काय हवे आहे यावर ते अवलंबून असतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.