IPL 2023: भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास! आयपीएलच्या इतिहासात केली अनोखी कामगिरी

Bhuvneshwar Kumar ipl 2023
Bhuvneshwar Kumar ipl 2023
Updated on

Bhuvneshwar Kumar SRH vs DC IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इतिहास रचला आहे. IPL इतिहासातील एका डावात पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या लीगच्या 34व्या सामन्यात त्याने संघासाठी आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली. पहिल्या डावातील पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिले. याशिवाय या लीगमध्ये सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करण्याच्या बाबतीतही भुवी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Bhuvneshwar Kumar ipl 2023
Prithvi Shaw IPL 2023 : पृथ्वी शॉचा पगार ८ कोटी, ६ मॅच ४७ धावा! दिल्ली कॅपिटल्सने दाखवला बाहेरचा रस्ता

भुवीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हैदराबादकडून गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीला आलेल्या फिल सॉल्टला गोल्डन डकवर बाद केले. आयपीएलच्या पहिल्याच षटकात भुवीचा हा 23वा बळी होता आणि तो या लीगमधील डावातील पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या प्रकरणात ट्रेंट बोल्ड 21 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

IPL च्या पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

  • 23 विकेट - भुवनेश्वर कुमार

  • 21 विकेट - ट्रेंट बोल्ट

  • 15 विकेट - प्रवीण कुमार

  • 13 बळी - संदीप शर्मा

  • 12 विकेट - झहीर खान

आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करण्याच्या बाबतीत भुवी आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिथे डीजे ब्राव्हो आधी होता. भुवीने सॉल्टला शून्यावर बाद केले आणि त्याच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद होणारा या लीगमधील 25 वा फलंदाज ठरला. म्हणजेच या लीगमध्ये भुवीने आतापर्यंत 25 फलंदाजांना शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे, तर ब्राव्होने 24 फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. या प्रकरणात लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने 36 फलंदाजांना शून्यावर बाद केले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारे शीर्ष 4 गोलंदाज

  • 36 - मलिंगा

  • 25 - भुवनेश्वर

  • 24 - डी ब्राव्हो

  • 22 - उमेश यादव / टी बोल्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.