MI vs DC, IPL: मुंबईविरुद्ध सामना खेळण्यापूर्वीच दिल्लीला धक्का; कुलदीपपाठोपाठ प्रमुख ऑलराउंडर संघाबाहेर?

Delhi Capitals: मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सामना खेळण्यापूर्वीच दिल्लीला मोठे धक्के बसले असून त्यांना आता प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागणार आहेत.
Sakal
Delhi Capitals | IPL 2024Sakal
Updated on

Delhi Capitals News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 20 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यातून संघाचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव मांडीजवळ झालेल्या दुखापतीमुळे (Groin Injury) बाहेर झाला आहे. याशिवाय आता अष्टपैलू मिचेल स्टार्कच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.

याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

Sakal
IPL 2024 : RCB विरुद्धच्या पराभवानंतर संजूच्या RR बसला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज पुढच्या सामन्यातून बाहेर

दरम्यान, गांगुलीने मार्शला दुखापत झाल्याचे सांगितले असले, तरी त्याला कोणती दुखापत झाली आहे आणि त्याला त्यातून बाहेर येण्यासाठी किती काळ लागेल याबाबत माहिती दिलेली नाही. तथापि, या दुखापतीमुळे मार्शला या सामन्यातून न खेळवण्याचा विचार दिल्ली कॅपिटल्स करण्याची शक्यता आहे.

मार्शने दिल्लीकडून आयपीएलच्या 17 व्या हंगामात चारही सामने खेळले आहेत. मात्र, त्याला अद्याप त्याचा प्रभाव पाडता आलेला नाही. त्याने या 4 सामन्यात 61 धावा केल्या असून एकच विकेट घेतली आहे.

त्यामुळे आता जर मुंबईविरुद्ध कुलदीप आणि मार्श हे खेळणार नसतील, तर दिल्लीला त्यांच्याजागेसाठी दुसरे पर्याय शोधावे लागणार आहेत.

Sakal
RCB Vs RR : सामन्यादरम्यान विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिली थप्पड मारण्याची धमकी? व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, दिल्ली मार्शच्या जागेवर 21 वर्षीय जॅक फ्रेझर-मॅगर्क याला संधी देऊ शकतात. तसेच कुलदीपच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल पूर्णवेळ फिरकीपटू म्हणूनही खेळताना दिसू शकतो.

जॅक फ्रेझर-मॅगर्कने ऑस्ट्रेलियासाठी 2 वनडे सामने खेळले आहेत. त्याने टी20मध्ये आत्तापर्यंत 37 सामन्यांत 3 अर्धशतकांसह 645 धावा केल्या आहेत.

अशी असू शकते दिल्लीची प्लेइंग इलेव्हन

  • पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमीत कुमार, रसिक दार सलाम, एन्रिच नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद, जॅक फ्रेझर-मॅगर्क.

  • इम्पॅक्ट प्लेअर - अभिषेक पोरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.