इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात जवळपास 30 सामने होत आले असताना अचानक कोरोनाने बायो बबल भेदला. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) एका खेळाडूला कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. यापूर्वी त्यांच्या फिजिओला देखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, इतर खेळाडूंची आरटी - पीसीआर चाचणी ही निगेटिव्ह आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर #CancelIPL हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. अनेक नेटकऱ्यांनी ट्रेंडच्या आडून सीएसके आणि मुंबई इंडियन्स या खराब कामगिरी करणाऱ्या संघांना ट्रोल करत आहे. असे असले तरी आयपीएलचा 15 वा हंगाम हा रद्द करण्याबाबात बीसीसीआयचे नवे नियम काय (BCCI COVID - 19 Rule) आहेत हेही पाहणे गरजेचे आहे.
आज सकाळी दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू देखील कोरोना बाधित झाल्याचे वृत्त आले. त्यानंतर दिल्लीचा पुढचा प्रवास थांबवण्यात आला. आताच आलेल्या वृत्तानुसार इतर दिल्लीच्या खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आयपीएलवरील कोरोनाचे संकट टळलेले नाही. गेल्या वर्षी देखील आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित हंगाम हा युएईमध्ये पूर्ण करण्यात आला होता. यानंतर बीसीसीआयने आयपीएलसाठी कोरोनाबाबत काही नवे नियम तयार केले.
प्रेक्षकांबाबत घेतलेला निर्णय
यंदाच्या आयपीएल हंगामात स्टेडियममध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना दाखल होण्याची परवानगी दिली आहे.
आयपीएलमध्ये खेळाडू किंवा संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय?
एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला सात दिवस क्वारंटाईन केले जाईल. यावेळी त्याची सहाव्या आणि सातव्या दिवशी कोरोना चाचणी केली जाईल. संघाच्या बायो बबलमध्ये पुन्हा दाखल होण्यासाठी त्याच्या गेल्या 24 तासातील दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह याव्या लागतील.
एका संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाले तर?
जर एकाच संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर जर संघाचे 12 कोरोना निगेटिव्ह खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध असतील तर त्यांना 11 खेळाडूनिशी सामन्यात उतरता येईल. यात सात भारतीय खेळाडू आणि एक सब्सिट्यूट खेळाडू असेल. जर एखाद्या संघाकडे 12 पेक्षा कमी खेळाडू उपलब्ध असतील त्यावेळी बीसीसीआय सामना दुसऱ्या दिवशी आयोजित करेल. जर या दोन्ही गोष्टी होऊ शकल्या नाहीत तर हा विषय तांत्रिक समितीकडे जाईल. त्यांचा निर्णय अंतिम असेल.
गेल्या वर्षीच्या तुलनते यंदाच्या बायो बबलमध्ये काय आहेत बदल?
यंदाच्या बायो बबलमध्ये क्वानंटाईन बाबतच्या नियमात बदल करण्यात आला आहे. गेल्या बायो बबलमध्ये संघातील व्यक्तीला सात दिवस क्वानंटाईन सक्तीचे होते. यावेळी त्यात घट करण्यात आली आहे. आता संघातील सदस्यांना फक्त तीन दिवसांचे क्वानंटाईन देण्यात आले आहे. तीन दिवशी प्रत्येक 24 तासानंतर सदस्याची कोरोना चाचणी होणार आहे. जर एखादा खेळाडू एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये दाखल झाला आहे त्यासाठी हा नियम लागू नाही.
आयपीएलच्या व्हेन्यूचे केंद्रीकरण
कोरोना काळात संघाला फार प्रवास करावा लागू नये यासाठी यंदाची आयपीएल ही महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन जवळ जवळ असलेल्या शहरात आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील तीन तर पुण्यातील एका मैदानावर संपूर्ण आयपीएलचे लीगमधील सामने खेळवले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.