Hardik Pandya: 'माझी विकेट गेली आणि...', मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार हार्दिक?

IPL 2024, MI vs RR: राजस्थान रॉयल्सने सोमवारी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का दिला. हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला असून यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणाला जाणून घ्या.
Mumbai Indians | IPL 2024
Mumbai Indians | IPL 2024Sakal
Updated on

IPL 2024, MI vs RR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सोमवारी (1 एप्रिल) सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

हा राजस्थानचा सलग तिसरा विजय ठरला, तर मुंबईचा मात्र सलग तिसरा पराभव ठरला. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्सच्या खात्यात शुन्यच गुण आहेत. तसेच या हंगामात घरच्या मैदानात पराभूत होणारा मुंबई इंडियन्स दुसरा संघ ठरला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने हा पराभव कठीण असल्याचे मान्य केले.

Mumbai Indians | IPL 2024
World Cup 2011: वानखेडे स्टेडियम, धोनीचा विजयी षटकार, गौतमची 'गंभीर' खेळी अन् भारताचा विश्वविजय, पाहा तो सुवर्णक्षण

हार्दिक सामन्यानंतर म्हणाला, 'हो, कठीण पराभव होता. आम्हाला जशी सुरुवात करायची होती, तशी करता आली नाही. मला राजस्थानला कडवा प्रतिकार करायचा होता, आम्ही नंतर एका क्षणी अशा परिस्थितीत होतो की 150-160 धावांपर्यंत पोहचू, पण माझ्या विकेटने त्यांना पुन्हा सामन्यात पुनरागमनाची संधी मिळाली.'

'मला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. पण ठिक आहे, आम्ही अशा खेळपट्टीची अपेक्षा केली नव्हती, पण तुम्ही नेहमीच फलंदाजीला पोषक खेळपट्टीची अपेक्षा करू शकत नाही, गोलंदाजांसाठी हा एक चांगला दिवस होता, असं मी म्हणेल.'

'तुम्ही किती योग्य गोष्टी करता, हे महत्त्वाचे आहे, मग बाकी तुमच्या बाजूने निकाल कधी लागतो, कधी नाही. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे आम्ही अजून चांगला खेळ करू शकलो असतो. आम्हाला आणखी योग्य आणि धैर्याने खेळण्याची गरज आहे.'

Mumbai Indians | IPL 2024
IPL 2024, MI vs RR: स्टेडियमची सुरक्षा तर तोडलीच, पण मैदानात घुसत चाहत्याने रोहितलाही घाबरवलं, पाहा नक्की झालं काय?

या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी 20 धावांवरच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर हार्दिक आणि तिलक वर्माने अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळला होता.

मात्र, हार्दिक 34 धावांवर बाद झाला, तर तिलक 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर मुंबईला 20 षटकात 9 बाद 125 धावा करता आल्या. गोलंदाजीत राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी 3 विकेट्स घेतल्या.

राजस्थानकडून 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रियान परागने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांनी छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे राजस्थानने 15.3 षटकातच 4 विकेट्स गमावत 127 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईकडून गोलंदाजी करताना आकाश मधवालने 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()