रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचे तीनही प्रकारातील कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने धाडाकेबाज कामगिरी करण्यास सुरूवात केली आहे. टी 20 मालिका, वनडे मालिका आणि आता कसोटी मालिकेत प्रतिस्पर्ध्यांना व्हाईट वॉश देणारा रोहित शर्मा आयपीएल (IPL 2022) झोनमध्ये गेला आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान, श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका संपल्या संपल्या रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला भेटला. यावेळी प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि रोहितमध्ये चर्चा झाली.
रोहित ज्यावेळी जयवर्धनेला भेटला त्यावेळीचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत जयवर्धने रोहितला 'जेव्हापासून रोहित कॅप्टन झाला आहे तेव्हापासून त्याची केसं पांढरी होत आहेत.' असे म्हणाला. गेल्या वर्षी टी 20 वर्ल्डकप नंतर रोहित शर्माने भारतीय टी 20 आणि वनडे संघाचे नेतृत्व आपल्या हातात घेतले. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत भारताने कसोटी मालिका 2-1 ने गमावल्यानंतर कसोटी संघाचे नेतृत्व देखील रोहितकडेच आले.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने मायदेशात खेळल्या गेलेल्या टी 20 आणि कसोटी मालिकेत श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला. रोहितच्या नेतृत्वात आता मायदेशातील 17 टी 20 सामन्यापैकी 16 सामने जिंकले आहेत. त्याने या बाबतीत इंग्लंडच्या इऑन मॉर्गन आणि न्यूझीलंडच्या केन विलियमसन मागे टाकले आहे. रोहितने टी 20 संघाचे नेतृत्व करताना एकूण 24 सामन्यातील 22 सामन्यात विजय मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.