आयपीएल लिलावात (IPL Auction 2022) ज्या प्रकारे खेळाडूवर बोली लावली जाते ती पद्धत अनेकांना रूचत नाही. याचबाबत चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) खेळाडूंने लिलावात जनावर (Animals) असल्यासारखे वाटते असे मत व्यक्त करून या चर्चेला वाचा फोडली. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आयपीएल लिलावाबाबत आपले मत व्यक्त केले. उथप्पा म्हणाला की, लिलावादरम्यान आम्ही काही वेळापूर्वी परीक्षा दिली आहे. आता त्याचा निकाल येणार आहे. त्यावेळी तुमच्यामध्ये बोली लावली जाणारे जनावर असल्यासारखी भावना तयार होते. (Chennai Super Kings Player Robin Uthappa says in IPL Auction we feel like animals)
रॉबिन उथप्पा या मुलाखतीत म्हणाला, 'लिलाव ही सुखद भावना नाही. क्रिकेटच्या (Cricket) दृष्टीकोणातून मला असे वाटते. विशेषकरून भारतात, तुम्ही जगाच्या दृष्टीने उपभोगाची एक वस्तू आहात. त्या दृष्टीनेच तुमचा निर्णय होतो आणि तुमच्याबद्दल मत व्यक्त केले जाते. तुमच्या कामगिरीबाबत एक मत असणे दुसरी गोष्ट आहे. मात्र तुम्ही कितीला विकले गेलात याच्यावर गोष्टी ठरणे ही एक वेगळीच गोष्ट आहे.'
रॉबिन उथप्पाने जरी लिलावाबद्दल आपले मत व्यक्त केले असले तरी त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याबाबत वेगळीच भावना बोलून दाखवली. तो म्हणाला, 'सीएसके सारख्या संघातून खेळण्याची माझी इच्छा होती. यासाठी मी प्रार्थना करत होतो. माझ्या मुलाने देखील यासाठीच प्रार्थना केली होती. मला फक्त सीएसकेकडूनच खेळायचे होते. मला या संघात सुरक्षितता आणि सन्मान मिळतो.'
आयपीएल 2022 लिलावात रॉबिन उथप्पाला सीएसकेने (CSK) 2 कोटी बेस प्राईसला खरेदी केले. यापूर्वी रॉबिन उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. रॉबिन उथप्पाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित 46 वनडे आणि 13 टी 20 सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी 20 वर्ल्डकप जिंकला होता त्या संघात देखील रॉबिन उथप्पाचा समावेश होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.