CSK vs KKR : सीएसकेचा कर्णधार चमकला; विजयी चौकार मारत केकेआरला दिला पहिला पराभवाचा धक्का

Ruturaj Gaikwad
CSK vs KKR esakal
Updated on

Chennai Super Kings Vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्जने आपला बालेकिल्ला चेपॉक स्टेडियम केकेआच्या आक्रमणापासून वाचवलं. चेन्नईने केकेआरचा 7 विकेट्सनी पराभव करत त्यांची विजयी मालिका खंडित केली. केकेआरने विजयासाठी ठेवलेल्या 138 धावांचे आव्हान चेन्नईने 17.4 षटकात पार केलं. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 चेंडूत नाबाद 67 धावांची दमदार खेळी केली. त्याला शिवम दुबेने 28 तर डॅरेल मिचेलने 25 धावा करत चांगली साथ दिली. केकेआरकडून वैभव अरोराने दोन विकेट्स घेत चुणूक दाखवली.

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 137 धावात रोखले. पहिल्या चेंडूपासून विकेट घेण्याचा सपाटा लावणाऱ्या तुषार देशपांडे 3 तर रविंद्र जडेजानेही 3 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजूर रहमानने 2 विकेट्स घेतल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 34 धावा केल्या. सुनिल नारायणने 27 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र फेल गेले.

धोनी आला क्रिजवर, मात्र ऋतुराजने केले विजयावर शिक्कामोर्तब

शिवम दुबे बाद झाल्यानंतर अवघ्या 3 धावांसाठी धोनी मैदानात आला. मात्र षटक संपल्याने स्ट्राईक ऋतुराजकडेच आलं होतं. ऋतुराजनेही एक धाव करून पुन्हा स्ट्राईक धोनीकडे दिलं. धोनीने विजयी षटकार मारण्याऐवजी एकेरी धाव घेत पुन्हा स्टाईक ऋतुराजकडे दिलं. त्यानं विजयासाठी आवश्यक एक धाव चौकाराने पूर्ण करत चेन्नईचा तिसरा विजय प्राप्त केला.

शिवम दुबेची फटकेबाजी 

डॅरेल मिचेल बाद झाल्यानंतर विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला. त्याने तडाखेबाज खेळी करत चेन्नला 17 व्या षटकातच विजयाच्या जवळ आणून ठेवले. त्याने 18 चेंडूत 28 धावा केल्या. मात्र विजयासाठी 3 धावांची गरज असताना अरोराने त्याला बाद केलं.

ऋतुराजचे अर्धशतक, चेन्नई विजयाचा उंबरठ्यावर 

चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अखेर डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा चांगला सामना केला. त्याने मिचेल स्टार्कविरूद्ध चांगली फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज विजयाचा उंबरठ्यावर उभा आहे.

चेन्नई सुपर किंग्जने केकेआरला 137 धावात रोखलं

सीएसकेने केकेआरला 20 षटकात 9 बाद 137 धावात रोखलं. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर मुस्तफिजूर रहमानने 2 विकेट्स घेतल्या. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 34 धावा केल्या.

केकेआरचा कर्णधार एकटा लढतोय 

केकेआरचा निम्मा संघ 85 धावात गारद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत संघाला 18 षटकात 122 धावांपर्यंत पोहचवले. आता शेवटच्या षटकात अय्यर आणि आंद्रे रसेल केकेआरला कुठंपर्यंत घेऊन जातात हे पाहावं लागेल.

CSK vs KKR Live Score Update : जडेजाने पाडलं भगदाड; केकेआरचा डाव गडगडला

रविंद्र जडेजाने केकेआरला तीन धक्के देत मोठं भगदाड पाडलं. जडेजाने अंगक्रिश रघुवंशी, आणि सुनिल नरायण यांना एकाच षटकात बाद केलं. त्यानंतर व्यंकटेश अय्यरला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जडेजापाठोपाठ तिक्षाणाने देखील केकेआरला धक्का दिला. त्याने रमनदीप सिंहला बाद केलं. केकेआरचा निम्मा संघ 12 षटकात 85 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला

तुषार देशपांडेने दिला पहिला धक्का 

तुषार देशपांडेने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फिल्प सॉल्टला बाद करत सीएसकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर केकेआरने 2 षटकात फक्त 7 धावा केल्या.

CSK vs KKR Live Score Update : चेन्नईने अर्धी लढाई जिंकली; नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या बाजूने

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. घरच्या मैदानावर टॉस जिंकल्याने सीएसकेला सामन्यात मोठी संधी असेल. सीएसकेने सामन्यात दोन बदल केले असून पथिरानाच्या ऐवजी मुस्तफिजूर रहमान संघात आला आहे. तर रिझवीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.