IPL 2024: पुजारा परतणार CSK संघात? मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी केलेल्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Cheteshwar Pujara Post: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने केलेल्या पोस्टने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraSakal
Updated on

Cheteshwar Pujara Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (14 एप्रिल) 29 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात वानखेडे स्टेडियमर होणार आहे. या सामन्याआधीच भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने केलेल्या एक पोस्टने मात्र अचानक खळबळ उडवली आहे.

त्याच्या पोस्टमुळे पुजारा पुन्हा चेन्नई संघात परतणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पुजाराने ट्विटरवर (X) रविवारी दुपारी 12 च्या सुमारास पोस्ट केली आहे की 'सुपर किंग्स या हंगामात तुमच्याशी जोडण्यासाठी उत्सुक आहे.'

Cheteshwar Pujara
Team India Squad WC 2024 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला मिळाला 'X-फॅक्टर', सूर्याची घेणार जागा?

त्याच्या या पोस्टनंतर मात्र अनेकांनी कयास लावला आहे की कदाचित चेतेश्वर पुजारा पुन्हा चेन्नई संघात सामील होऊ शकतो.

दरम्यान, पुजाराने या पोस्टमध्ये आयपीएलचा किंवा आयपीएलमधील कोणत्याही संघाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. याशिवाय त्याने या पोस्ट मागील हेतूही स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे सध्यातरी त्याच्या या पोस्टबाबत चाहते अंदाज बांधताना दिसत आहेत.

काही चाहत्यांच्या मते सध्या चेन्नईचा फलंदाज डेवॉन कॉनवे दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो अद्याप संघात सामील झालेला नाही. तसेच त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा अद्याप चेन्नईने केलेली नाही. त्यामुळे कॉनवेच्या जागेवर पुजाराला चेन्नई संघात घेऊ शकते.

Cheteshwar Pujara
Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या बसचा हिटमॅन सारथी! चाहत्यांसमोरच स्विकारली नवी भूमिका, Video Viral

पुजारा यापूर्वी 2021 आयपीएल हंगामावेळी चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्याआधी झालेल्या लिलावात त्याला चेन्नईने 50 लाखांच्या किंमतीत संघात घेतले होते. मात्र, या हंगामात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

दरम्यान या हंगामानंतर त्याला चेन्नईने करारमुक्त केले होते. त्यानंतर पुजारा आयपीएल खेळलेला नाही. पुजाराने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 30 सामनेच खेळले आहेत. यामध्ये त्याने एका अर्धशतकासह ३९० धावा केल्या आहेत. त्याने यापूर्वी चेन्नई व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्स या संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.