Cheteshwar Pujara and Steve Smith : आयपीएल 2023 नंतर लगेचच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळल्या जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमीसारखे अनुभवी खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत.
पण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडलेला चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे आणि शतकांवर शतके झळकावत आहे. पुजाराने मागील सामन्यात 2 शतके झळकावली. तो ससेक्सचा कर्णधारही आहे.
आता त्याने डब्ल्यूटीसी जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक लावला आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ. स्मिथने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ऍशेसपूर्वी इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुजाराच्या नेतृत्वाखाली ससेक्सकडून खेळणार आहे.
स्मिथ ससेक्सकडून वूस्टरशायर (4-7 मे), लीसेस्टरशायर (11-14 मे) आणि ग्लॅमॉर्गन (18-22 मे) विरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यांद्वारे स्मिथ 16 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी तयारी करेल.
स्टीव्ह स्मिथने ससेक्ससोबत 3 सामन्यांचा करार केला आहे. तो या आठवड्यात कौंटी संघात सामील होईल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि ऍशेस मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी तीन सामने खेळेल.
या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान स्मिथने पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आणि चेतेश्वर पुजाराची विकेट घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या कसोटीत त्याने लेग स्लिपमध्ये पुजाराचा झेलही टिपला.
ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या ससेक्स संघात सामील होण्याच्या निर्णयाबद्दल चेतेश्वर पुजारा म्हणाला, आमची चर्चा सुरू आहे. पण, बहुतेक वेळा आम्ही एकमेकांविरुद्ध खेळतो. आम्ही कधीही संघात नव्हतो. त्यामुळे त्याच्यासोबत एकाच संघात असणे रोमांचकारी असेल. मैदानावर आमची नेहमीच चांगली लढत होते, पण मैदानाबाहेर आम्ही चांगले मित्र आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.