Cricket Australia : पैसा बोलता हैं! IPL फ्रेंचायजींमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया 'हे' स्टार खेळाडू कायमचे गमावणार?

ipl Cricket Australia
ipl Cricket Australia esakal
Updated on

IPL 2023 Cricket Australia : आयपीएलचा 16 वा हंगाम नुकातच भारतात सुरू झाला आहे. याचबरोबर अजून काही देशात टी 20 क्रिकेट लीग सुरू झाल्या आहेत. या लीगमध्ये बऱ्याच भारतीय फ्रेंचायजींनी (IPL) संघ खरेदी केले आहेत. आता हे संघ ऑस्ट्रेलियातील काही स्टार खेळाडूंना मल्टी क्लब डील ऑफर करणार आहेत.

या डीलमुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना जवळपास 41 कोटी रूपये (7.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर) मिळणार आहेत. आरसीबी आणि गुजरात टायटन्स सोडले तर 10 पैकी इतर 8 आयपीएल फ्रेंचायजींनी इतर देशातील लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत.

ipl Cricket Australia
DC vs MI Yash Dhull : अर्जुन नाही तर U19 वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज करणार IPL पदार्पण

एजने दिलेल्या माहितीनुसार मल्टी क्लब डीलसाठी आयपीएल फ्रेंचायजींनी काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंशी संपर्क देखील केला आहे. या डीलची रक्कम जवळपास 41 कोटी रूपयांपर्यंत जात आहे. कॅमरून ग्रीन हा आयपीएलच्या 2023 च्या हंगामातील सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याला 17 कोटी मिळाले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या करारातून जवळपास 15 कोटी रूपये कमवतोय.

आयपीएल फ्रेंचायजींच्या या नव्या डीलमुळे हे खेळाडू आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीला दुय्यम स्थान देण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतेच 24 पात्र खेळाडूंसाठी पाच वर्षाचा एमओयू जाहीर केला आहे. यानुसार खेळाडूंना सरासरी 9,51,000 ऑस्ट्रेलियन डॉलर मिळतील. आयपीएल फ्रंचायजी यापेक्षा कितीतरी पटीने चांगली डील देत आहे.

ipl Cricket Australia
Sunil Gavaskar : गेल्या हंगामापासून MI साठी ही मोठी समस्या झाली आहे... गावसकरांनी सांगितलं घोडं कुठं अडलंय

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा एजंट नाईल मॅक्सवेलने एजशी बोलताना सांगितले की, 'आता ही गोष्ट जवळ आली आहे. हे घडत आहे. लवकरच खेळाडू त्यांच्या स्थानिक क्लबकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करतील. कारण काही खेळाडूंनी आधीच हे गलेलठ्ठ करार स्विकारले आहेत.'

मॅक्सवेल पुढे म्हणाले की, 'गेल्या अनेक वर्षापासून जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल कामगिरी करून अव्वल खेळाडू असे नाव कमावलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाकडून 12 महिने क्रिकेट खेळण्यासाठी 1.5 मिलियन युएस डॉलर मिळतात. हे गणित कुठं बसत नाही.'

Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()