IPL 2024 : CSK च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर नाराज दिसला कर्णधार ऋतुराज; म्हणाला...

Ruturaj Gaikwad SRH vs CSK IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला.
Ruturaj Gaikwad
CSK Captain Ruturaj Gaikwad Newssakal
Updated on

Ruturaj Gaikwad SRH vs CSK IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.1 षटकांत 4 गडी गमावून 166 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला. या हंगामात सलग दुसऱ्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने खराब क्षेत्ररक्षणासह खेळपट्टी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.

Ruturaj Gaikwad
IPL 2024 Points Table : चेन्नईच्या पराभवाचा दोन संघाना बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, खरे सांगायचे तर ही विकेट खूपच संथ होती, आणि त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या 5 षटकांमध्ये त्यांनी आम्हाला फलंदाजी करण्याची संधी दिली नाही. यासोबतच त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करायला आल्यावर सुरुवातीपासूनच आमच्यावर दबाव आणला. ही खेळपट्टीही काळ्या मातीची होती, आणि जसजसा सामना पुढे जात होता, तसतशी ही खेळपट्टी आणखी हळू होत गेली.

पुढे तो म्हणाला की, या खेळपट्टीवर आपण किमान 170 ते 175 असा स्कोअर करायला हवा होता. पॉवरप्लेमध्येही आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली नाही, पण नंतर दव पडल्यामुळे धावा काढणे थोडे सोपे झाले. आम्ही एक झेल देखील सोडला ज्यामुळे आमच्यासाठी फरक पडला. 15व्या आणि 16व्या षटकातही मोईन अली चेंडू फिरवत असला तरी खेळपट्टीत फारसा बदल झालेला नाही असे मला वाटते.

Ruturaj Gaikwad
धक्कादायक! पाकिस्तानच्या 2 दिग्गज महिला क्रिकेटपटूंच्या कारचा अपघात; PCB ने दिली अपडेट

या सामन्यातील चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार गायकवाड पुन्हा एकदा मोठी खेळी खेळू शकला नाही आणि 21 चेंडूत 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर रचिन रवींद्रलाही केवळ 12 धावा करता आल्या. मात्र, शिवम दुबेच्या बॅटमधून 24 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी नक्कीच पाहायला मिळाली. तर रवींद्र जडेजा 23 चेंडूत केवळ 31 धावा करू शकला. सीएसकेला आता 8 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध या मोसमातील पाचवा सामना खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.