Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Stephen Fleming: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाची चर्चा आहे. पण आता याबद्दल सीएसकेचे सीईओकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Stephen Fleming | CSK | IPL
Stephen Fleming | CSK | IPLX/ChennaiIPL
Updated on

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी (13 मे) रात्री भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आहे.

भारताच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल अनेक अंदाज व्यक्त होत आहे, तर नवनवीन अपडेटही समोर येत आहेत. बीसीसीआयने ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने माहिती दिली आहे की फ्लेमिंग यांच्याकडे राहुल द्रविडची जागा घेण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून बीसीसीआय पाहत आहे. सध्या द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक असून त्याचा जून 2024 पर्यंत करार आहे.

Stephen Fleming | CSK | IPL
Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

दरम्यान, फ्लेमिंग यांचा खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून असलेला तगडा अनुभव पाहाता, त्यांचा या पदासाठी विचार होत असल्याची चर्चा आहे. पण याबद्दल आता चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

फ्लेमिंग हे 2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान, जर फ्लेमिंग भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले, तर त्यांना चेन्नईचे प्रशिक्षकपद सोडावे लागेल.

दरम्यान, या चर्चांबद्दल कासी विश्वनाथन यांनी स्पोर्ट्स नाऊशी बोलताना सांगितले की 'मी असं काहीही ऐकलं नाहीये. अद्याप स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडून याबाबत चेन्नई सुपर किंग्सशीही कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही.'

Stephen Fleming | CSK | IPL
MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

तथापि, केवळ फ्लेमिंग यांचेच नाही, तर जस्टीन लँगर आणि टॉम मुडी या माजी खेळाडूंचीही नावे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांमधून मुलाखतीनंतर बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समीती नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीसाठी नव्या प्रशिक्षकाबरोबरचा सुरुवातीचा करार हा साडेतीन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. तसेच तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी एकच मुख्य प्रशिक्षक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.