IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

Deepak Chahar Injury Update : चेन्नई सुपर किंग्जचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे.
CSK Coach Stephen Fleming Concerned About Deepak Chahar Condition Amid Possible Injury
CSK Coach Stephen Fleming Concerned About Deepak Chahar Condition Amid Possible Injurysakal
Updated on

Deepak Chahar Injury Update : चेन्नई सुपर किंग्जचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, दीपक चहरची दुखापत अधिक गंभीर आहे. डॉक्टर आणि फिजिओ मूल्यांकन करत आहे. दीपक चहर पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. केवळ 2 चेंडू टाकून तो मैदानातून बाहेर गेला. यानंतर तो मैदानात परतलाच नाही.

CSK Coach Stephen Fleming Concerned About Deepak Chahar Condition Amid Possible Injury
टी-20 World Cupच्या रंगीत तालमीसाठी पाकिस्तान सज्ज! संघाची केली घोषणा, दोन पठ्ठ्यांची ताफ्यात एन्ट्री

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत स्टीफन फ्लेमिंगने दीपक चहरच्या दुखापतीबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे सध्या आम्ही खूप प्रवास करतोय. अनेक खेळाडू बाहेर पडत आहेत आणि काही आत येत आहेत. त्यात दीपक चहरची दुखापत चांगली दिसत नाहीये. एकदा फिजिओ आणि डॉक्टरांनी मूल्यांकन केल्यानंतर, मला सकारात्मक अहवालाची आशा आहे. मुस्तफिजुर रहमानचे जाणे हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. श्रीलंकेच्या दोन्ही खेळाडूंना व्हिसा मिळणार असून पुढील सामन्यापर्यंत ते उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. आणि तुषार देशपांडेला फ्लू झाला त्यामुळे आम्हाला आमच्या संघात काही बदल करावे लागतील.

CSK Coach Stephen Fleming Concerned About Deepak Chahar Condition Amid Possible Injury
टी-20 World Cupच्या रंगीत तालमीसाठी पाकिस्तान सज्ज! संघाची केली घोषणा, दोन पठ्ठ्यांची ताफ्यात एन्ट्री

चेन्नई सुपर किंग्ज संघाला अनेक मोठे झटके बसले आहेत. त्यांचे काही खेळाडू जखमी आहेत तर काही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत CSK च्या अडचणी खूप वाढल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जला सर्वात मोठा धक्का मुस्तफिजुर रहमानच्या रूपाने बसला आहे.

पंजाब किंग्जविरुद्धचा सामना खेळून तो बांगलादेशला परतला आहे. त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भाग घ्यायचा आहे आणि याच कारणामुळे तो यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही. तुषार देशपांडे सध्या फ्लूने त्रस्त आहेत. मथिशा पाथीराना आणि महिष तिक्शिना व्हिसा प्रक्रियेसाठी परत गेले आहेत, परंतु पुढील सामन्यापर्यंत ते परत येतील अशी अपेक्षा आहे. या कारणामुळे CSK च्या अडचणी खूप वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.