Deepak Chahar Injury : चेन्नई सुपर किंग्जने जरी मुंबई इंडियन्सचा पराभव केला असला तरी चेन्नईच्या डोकेदुखीत वाढ होणारी गोष्ट या सामन्यात घडली. आधीच बेन स्टोक्स आणि मोईन अली हे दुखापत आणि आजारपणामुळे सामन्याला मुकले होते. त्यात सामना सुरू असतानाच चेन्नईचा भरवश्याचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले. त्याला या दुखापतीमुळे सामना सुरू असतानाच मैदान सोडून बाहेर जावे लागले. आता त्याच्या या दुखापतीबाबत अपडेट आली आहे.
दीपक चाहरला याच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गेल्या आयपीएल हंगामात खेळता आले नव्हते. त्यानंतर त्याला आपले भारतीय संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. आता मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात पुन्हा या दुखापतीने उचल खाल्याने चिंतेचे वातावर होते. मात्र क्रिकबजच्या रिपोर्टनुसार यंदाच्या हंगामात दीपक चाहर 4 ते 5 सामने खेळू शकणार नाहीये.
चेन्नईसाठी फक्त दीपक चाहर ही एकच डोकेदुखी नाही. त्यांचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स देखील दुखापतग्रस्त झाला आहे. तो बोटाच्या दुखापतीमुळे एका आठवड्यासाठी सामने खेळू शकणार नाहीये. इंग्लंडचा कर्णधार मुंबई विरूद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. तो आता 17 एप्रिलच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरूद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तो राजस्थान विरूद्ध होणाऱ्या 12 एप्रिलच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये.
मुंबई विरूद्धच्या सामन्यात स्टोक्स पाठोपाठ मोईन अली देखील खेळू शकला नव्हता. त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. मात्र मोईनला फूड पॉजनिंग झालं होतं त्यामुळे तो सामना खेळी शकला नव्हता. तो पुढच्या सामन्यापूर्वी फिट होईल. मोईन अली चेन्नईसाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो गोलंदाजीही आपली भुमिका बजावू शकतो. तसेच मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करून संघाला एकहाती सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.