IPL 2024, CSK: चेन्नई टॉप 4 मध्ये तरी डोकेदुखी वाढली; धोनीचा लाडका बॉलर मायदेशी परतला; जाणून घ्या कारण

Matheesha Pathirana: चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2024 च्या अखेरच्या टप्प्यात डोकेदुखी वाढली आहे. त्यांचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना मायदेशी परतला असून त्यामागील कारणही आता स्पष्ट झालं आहे.
Matheesha Pathirana - MS Dhoni
Matheesha Pathirana - MS Dhoni X/ChennaiIPL
Updated on

Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 53 व्या सामन्यात पंजाब किंग्सला रविवारी (5 मे) 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह चेन्नईने आयपीएल 2024 च्या पाँइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे.

मात्र, हा विजय मिळवला असला तरी चेन्नईला काही गोष्टींची चिंता लागून राहिली आहे. चेन्नईसाठी त्यांच्या प्रमुख गोलंदाजांचा फिटनेस काळजीचा विषय ठरताना दिसत आहे.

रविवारी पंजाब विरूद्धच्या सामन्यादरम्यान चेन्नईने एक मोठी अपडेट सर्वांना दिली. ही अपडेट म्हणजे चेन्नईचा 21 वर्षीय स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना मायदेशी श्रीलंकेला परतला आहे.

पाथिरानाला हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याने तो त्यावरील पुढील उपचारासाठी श्रीलंकेला गेला आहे. त्यामुळे सध्यातरी तो परत कधी येणार आहे किंवा उर्वरित हंगामात खेळण्यासाठी येणार आहे की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

Matheesha Pathirana - MS Dhoni
IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

पाथिराना सुरुवातीच्या सामन्यालाही या दुखापतीमुळे मुकला होता. तसेच तो 1 मे रोजी चेपॉकला झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे त्याची दुखापत चेन्नईसाठी मोठा धक्का आहे.

कारण त्याने आयपीएल 2024 मध्ये खेळलेल्या सहाही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 6 सामन्यांतच 7.68 च्या इकोनॉमीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो धोनीला प्रभावित केलेल्या गोलंदाजांपैकी एक देखील आहे.

इतकेच नाही, तर चेन्नईचा अनुभवी वेगवान गोलंदाज दीपक चाहरनेही चेपॉकवर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 2 चेंडू टाकल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. काही रिपोर्ट्सनुसार तो धरमशालादेखील आला नसून चेन्नईमध्येच थांबला आहे. त्याच्या स्कॅनच्या रिपोर्ट्सची प्रतिक्षा चेन्नईला आहे.

त्याचबरोबर मुस्तफिजूर रेहमानही आयपीएल 2024 मधून बाहेर झाला आहे. तो 1 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल 2024 मधील शेवटचा सामना खेळला. त्याला राष्ट्रीय संघ बांगलादेशप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे मायदेशी परतेवा लागले आहे.

बांगलादेशला झिम्बाब्वेविरुद्ध 3 मे पासून टी20 मालिका खेळायची होती. त्यामुळे या मालिकेसाठी तो परत गेला आहे.

Matheesha Pathirana - MS Dhoni
MS Dhoni Video: हर्षल पटेलचा यॉर्कर अन् धोनी 'गोल्डन डक'वर परतला माघारी, यापूर्वी असं कधी झालंय?

एकूणच एकाचवेळी तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीने चेन्नईला अन्य पर्यायांचा विचार करावा लागला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात याचमुळे चेन्नईच्या संघात मोठे बदल दिसले. चेन्नईने मिचेल सँटेनर, तुषार देशपांडे आणि सिमरनजीत सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली.

श्रीलंकेलाही टेंशन

केवळ चेन्नईच नाही, तर श्रीलंकेलाही सध्या खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. पाथिरानाच्या आधीच दिलशान मदूशंकाही दुखापतग्रस्त असल्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 मध्ये खेळू शकला नाही.

त्याचबरोबर वनिंदू हसरंगालाही आयपीएल 2024 मधून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे अद्याप श्रीलंकेने आगामी टी20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणाही केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.