IPL 2023 CSK Playoffs Scenario: धोनीची CSK प्लेऑफमधून होणार बाहेर? या संघाकडून सर्वात मोठा धोका

जाणून घ्या CSKला काय करावं लागणार?
IPL 2023 CSK Playoffs Scenario
IPL 2023 CSK Playoffs Scenario
Updated on

IPL 2023 CSK Playoffs Scenario : आयपीएल 2023 शेवटच्या टप्प्यात चाहत्यांना रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आतापर्यंत प्लेऑफसाठी पात्र झाला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत.

प्लेऑफमधील उर्वरित तीन स्थानांसाठी 6 संघांमध्ये अजूनही लढत सुरू आहे. आता आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असे समीकरण आयपीएलमध्ये तयार होत आहे.

IPL 2023 CSK Playoffs Scenario
IPL 2023 Playoffs Scenario: पंजाबचा खेळ खल्लास! राजस्थानचे 14 गुण तरीही प्लेऑफच्या शर्यतीत; समजून घ्या गणित

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी त्याला पाचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून तो 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आज CSK संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. या सामन्यात सीएसकेचा संघ पराभूत झाला तर केवळ 15 गुण शिल्लक राहतील आणि त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होईल.

IPL 2023 CSK Playoffs Scenario
IPL 2023 Playoffs Scenario: 10 पैकी फक्त 1 संघाची एंट्री! 3 शर्यतीबाहेर; प्ले-ऑफसाठी 6 संघांचे बिघडले समीकरण

दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत आणि 15 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौच्या संघाचा आज केकेआरच्या संघाशी सामना आहे. जर लखनौचा संघ हा सामना जिंकला तर लखनौचा संघ 17 गुण घेऊन प्लेऑफसाठी पात्र ठरेल आणि दुसऱ्या क्रमांकावर राहील.

IPL 2023 CSK Playoffs Scenario
Yashasvi Jaiswal IPL 2023 : अवघ्या 21 वर्षाच्या यशस्वी जैसवलाने 15 वर्षापूर्वीचा विक्रम काढला मोडीत

आयपीएल 2023 मध्ये उद्या दोन सामने खेळवले जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. त्याचवेळी आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. आरसीबीचा संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबईचा संघ 14 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

जर RCB आणि मुंबई संघांनी शेवटचा साखळी सामना जिंकला तर दोन्ही संघांचे 16-16 गुण होतील. अशाप्रकारे आरसीबी तिसऱ्या आणि मुंबई चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद होऊ शकतात.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध CSK ला पराभव पत्करावा लागला तर मुंबई, RCB आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांनी शेवटचा सामना जिंकला तर CSK प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.