IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई विजयी हॅट्‍ट्रिकसाठी सज्ज! दोन विजय मिळवणाऱ्या राजस्थानशी सामना

चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आज घरच्या मैदानावर संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी करणार दोन हात
CSK Vs RR IPL2023 Today Match Latest Updates CSK Seek Straight Victories At Home cricket news in marathi
CSK Vs RR IPL2023 Today Match Latest Updates CSK Seek Straight Victories At Home cricket news in marathi
Updated on

CSK Vs RR IPL2023 : महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आज घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल लढतीत संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघांचे लक्ष्य यंदाच्या मोसमातील तिसरा विजय मिळवण्याचे असणार आहे.

चेन्नई-लखनौ यांच्यामध्ये चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आयपीएलच्या या मोसमातील पहिली लढत खेळवण्यात आली. या लढतीत दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला. त्यामुळे आजही या खेळपट्टीवर फलंदाजांचाच बोलबाला राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नईने पुढील दोन लढतींमध्ये लखनौ व मुंबईला पराभूत करीत या स्पर्धेमध्ये झोकात पुनरागमन केले. ऋतुराज गायकवाड (१८९ धावा), शिवम दुबे (७४ धावा), अजिंक्य रहाणे (६१ धावा), अंबाती रायुडू (५९ धावा) यांनी फलंदाजीत ठसा उमटवला आहे. डेव्होन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स यांनी अद्याप प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. स्टोक्सला दुखापत झाली आहे. उद्याच्या लढतीसाठी तो तंदुरुस्त नसल्यास ड्वेन प्रिटोरियस याला चेन्नईच्या अंतिम अकरा जणांच्या संघात संधी मिळू शकते.

चेन्नई येथील चेपॉकच्या खेळपट्टीवर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. तसेच हळुवारपणे चेंडू बॅटवर उशिरा येतो. त्यामुळे १७० ते १८० धावांचा पाठलाग करताना कठीण जाऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे.

फिरकीच्या त्रिमूर्तीकडून आशा

चेन्नईच्या संघात रवींद्र जडेजा, मोईन अली व मिचेल सँटनर हे फिरकी गोलंदाज आहेत. या तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत एकूण ११ विकेट मिळवले आहेत.

यशस्वी, बटलर फॉर्ममध्ये

राजस्थानसाठी जॉस बटलर (१५२ धावा) व यशस्वी जयस्वाल (१२५ धावा) या सलामी जोडीने दोन अर्धशतके झळकावत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. कर्णधार संजू सॅमसन यानेही एक अर्धशतक झळकावले आहे. शिमरॉन हेटमायर यानेही महत्त्वाच्या क्षणी खेळी केल्या आहेत; मात्र तरीही संजू व हेटमायर यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग व देवदत्त पडीक्कल यांच्याकडून म्हणावी तशी चांगली कामगिरी झालेली नाही.

गोलंदाजी विभाग सरस

राजस्थानचा गोलंदाजी विभाग हा चेन्नईपेक्षा सरस आहे. रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल या अनुभवी फिरकी गोलंदाजांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची क्षमता आहे. तसेच ट्रेंट बोल्ट व जेसन होल्डर हे परदेशी वेगवान गोलंदाज छान कामगिरी करत आहेत. राजस्थानच्या या गोलंदाजांना उद्या ऋतुराज, अजिंक्यसह चेन्नईच्या फलंदाजांचे आक्रमण रोखावे लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

चेन्नई सुपरकिंग्स - राजस्थान रॉयल्स वेळ - संध्याकाळी ७.३० वाजता

स्थळ - चेन्नई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.