IPL 2023 : पृथ्वी शॉ पुढील सामन्यातून बाहेर? कर्णधार डेव्हिड वॉर्नर रागात म्हणाला...

दिल्ली कॅपिटल्स आणि पृथ्वी शॉची कामगिरी खूपच खराब...
prithvi shaw
prithvi shaw
Updated on

आयपीएल 2023 मध्ये 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीने उत्कृष्ट विजय नोंदवला. या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव केला.

आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. संघाने पाचही सामने गमावले आहेत. पृथ्वी शॉची कामगिरी खूपच खराब आहे. याशिवाय त्यांचे अनेक खेळाडू काही विशेष कामगिरी करू शकत नाहीत. या सामन्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पृथ्वी शॉवर भडकला.

prithvi shaw
PAK vs NZ : कर्णधार बाबरचे शतक अन् रिझवानच्या अर्धशतकाने न्यूझीलंडचा पराभव, पाकिस्तानचा सलग दुसरा विजय

सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी सामन्याच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो की फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. पण पुन्हा आम्ही तसे करण्यात अपयशी ठरलो. आज आम्ही खूप वाईट कामगिरी केली. आम्ही लवकर विकेट गमावल्या. लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे व्हायला हवे होते. पण असे घडले नाही, तुम्ही रन आऊटसारख्या गोष्टींशी तडजोड करू नये. यामुळे तुम्हाला सामना महागात पडू शकतो.

पृथ्वी शॉ सध्या अतिशय खराब फॉर्ममध्ये जात आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये पाच सामने खेळले आहेत. पण त्याची बॅट एकाही सामन्यात चालली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. त्याला आरसीबीचा खेळाडू अनुज रावतने धावबाद केले.

prithvi shaw
Babar Azamने T20I मध्ये रचला इतिहास! रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडून वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉला केवळ 12 धावा करता आल्या होत्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो 7 धावा करून बाद झाला. तिसऱ्या सामन्यात त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खातेही उघडता आले नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने 15 धावा केल्या होत्या. एकूण पाच सामन्यांत त्याला केवळ 34 धावा करता आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.