IPL 2023 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा धावांनी पराभव केला. चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र सीएसकेने दिल्लीला 146 धावात गुंडाळले. चेन्नईने 77 धावांनी सामना जिंकत थाटात प्ले ऑफ गाठले.
तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने आपल्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची चांगलीच धुलाई केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 षटकात 3 बाद 223 धावा केल्या. यात सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 51 चेंडूत 87 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 79 धावा केल्या. शिवम दुबेने 9 चेंडूत 22 तर रविंद्र जडेजाने 7 चेंडूत 20 धावा करत आपले हात धुवून घेतले.
दिल्लीची अवस्था 3 बाद 26 धावा अशी झाली असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला 11 व्या षटकात 75 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्याला साथ देणारा यश धूल 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. मात्र 8 चेंडूत 15 धावा केल्यानंतर दीपक चाहरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, अर्धशतक पूर्ण केलेला वॉर्नर सत्तरीत पोहचला होता.
डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 86 धावांची झुंजार खेळी करत दिल्लीला 140 धावांच्या पार पोहचवले. मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधाराला कोणाचीही साथ लाभली नाही. अखेर चेन्नईने दिल्लीला 20 षटकात 9 बाद 146 धावात रोखत आपले प्ले ऑफचे तिकीट नक्की केली.
चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ 5 धावा करून तुषार देशपांडेची शिकार झाला. त्यानंतर आलेला फिल्प सॉल्ट 3 धावांची भर घालून परतला. त्याला दीपक चाहरने बाद केले. दीपकने पुढच्याच चेंडूवर रायली रूसोला भोपळाही न फोडता माघारी धाडले.
ऋतुराज 79 धावांवर बाद झाल्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या डेवॉन कॉन्वेने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. ऋतुराज षटकारांची लयलूट करत होता. तर कॉन्वेने चौकारांचा पाऊस पाडला. त्याला साथ देणाऱ्या शिवम दुबेची खेळी 9 चेंडूतच संपुष्टात आली. मात्र या 9 चेंडूत दुबेने 22 धावा चोपल्या होत्या. 19 वे षटक आले त्यावेळी चेन्नईन 200 च्या उंबरठ्यावर पोहचली होती.
आता धोनी क्रिजवर आला होता. मात्र तोपर्यंत डेवॉन कॉन्वे 52 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर शेवटच्या दोन षटकात रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी 28 धावा करत चेन्नईला 223 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावा ठोकल्या.
चेन्नईला पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी मजल मारून देणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने आपला धडाका पॉवर प्लेनंतरही कायम ठेवला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत चेन्नईसाठी शतकी भागीदारी रचली. ऋतुराजने षटकारांची बरसात करत 50 चेंडूत 79 धावा चोपल्या. अखेर त्याची खेळी 15 व्या षटकात चेतन साकरियाने संपवली. मात्र तोपर्यंत चेन्नईन 150 च्या जवळ पोहचली होती. कॉन्वे आणि ऋतुराजने 141 धावांची सलामी दिली.
दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने पॉवर प्लेमध्ये 52 धावांची नाबाद सलामी देत सीएसकेला आश्वासक सुरूवात करून दिली.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा संघ कोणताही बदल न करता खेळत आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. ललित यादव हा सामना खेळत आहे.
चार वेळा विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. याप्रसंगी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.