महेंद्रसिंह धोनीने आपला व्हिंटेज गेम दाखवला. त्यानं 231 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत 37 धावा ठोकल्या. मात्र दिल्लीनं सामना 20 धावांनी जिंकून आपलं विजयाचं खातं उघडलं. दिल्लीने ठेवलेल्या 192 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 6 बाद 171 धावा करता आल्या. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 45 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 3 तर खलीलने 2 विकेट्स घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 5 बाद 191 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी अन् पृथ्वी शॉने (43 धावा) त्याला उत्तम साथ देत 10 षटकात 91 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र दिल्लीची घसरण झाली. पथिरानाने दिल्लीला पाठोपाठ धक्के देत दिल्लीची धावगती कमी केली.
मात्र कर्णधार ऋषभ पंतने काऊंटर अटॅक करत 32 चेंडूत अर्धशतकी (51) खेळी केली. त्यामुळे दिल्लीने 170 धावांचा आकडा पार केला. मात्र पथिरानाने पंतची देखील खेळी संपवली. त्याने 4 षटकात 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. जडेजा आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धोनीने 16 चेंडून नाबाद 37 धावा ठोकल्या. धोनीच्या या खेळीनंतरही चेन्नईला 20 धावा कमी पडल्या.
मुकेश कुमारने अजिंक्य रहाणे शिवन दुबे अन् समीर रिझवी यांना बाद करत चेन्नईची अवस्था 6 बाद 120 धावा अशी केली होती. त्यानंतर धोनी अन् रविंद्र जडेजाने आक्रमक फंलदाजी करत सामन्यात जीव ओतण्याचे काम केले. चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूत 58 धावांची गरज होती.
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 192 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर चेन्नईची सुरूवात संथ झाली. दिल्लीच्या खलील अहमदने ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र या दोन सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेल यांनी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेन्नईला 9 षटकात 58 धावांपर्यंतच मजल मारता आली.
ऋषभ पंतने 31 चेंडूत 51 धावांची दमदार खेळी करत दिल्लीला 170 धावांचा आकडा गाठून दिला. मात्र पिथिरानाने पंतला पुढच्याच चेंडूवर बाद करत दिल्ली मोठा धक्का दिला.
पथिरानाने दिल्लीला दिलेल्या धक्क्यातून कर्णधार ऋषभ पंतने सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला 18 व्या षटकात 162 धावांपर्यंत पोहचवले.
दमदार सुरूवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा 10 षटकानंतर डाव घसरला. जडेजाने 43 धावांवर पृथ्वी शॉला बाद केलं त्यानंतर पथिरानाने शॉन मार्शचा 18 धावांवर त्रिफळा उडवत दिल्लीला 14.4 षटकात 134 धावांवर तिसरा धक्का दिला.
10 व्या षटकात मुस्तफिजूरने डेव्हिड वॉर्नरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. पथिरानाने 52 धावांची खेळी करणाऱ्या वॉर्नरचा डाईव्ह मारत भन्नाट कॅच पकडला.
डेव्हिड वॉर्नरने 33 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला 9 षटकात 91 धावांपर्यंत पोहचवलं. त्याला पृथ्वी शॉने 22 चेंडूत 34 धावा करत चांगली साथ दिली.
पॉवर प्लेच्या पहिल्या 4 षटकात 24 धावांवर असणाऱ्या दिल्लीने पॉवर प्लेच्या शेवटच्या दोन षटकात गिअर बदलला. वॉर्नरने दीपक चाहरला आक्रमक फटके मारले. तर मुस्तफिजूरने देखील धावा दिल्या. यामुळे दिल्लीने 6 षटकात 63 धावांपर्यंत मजल मारली. चाहरने 18 तर मुस्तफिजूरने 20 धावा दिल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलेच दमवले. पहिल्या 4 षटकात दिल्लीला फक्त 24 धावा करता आल्या.
ऋषभ पंतने सीएसकेविरूद्धच्या सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. कुलदीप यादवला दुखापत झाल्याने तो आजचा सामना खेळणार नाहीये त्याच्या ऐवजी इशांत शर्माला संधी मिळाली आहे. रिकी भुईच्या ऐवजी पृथ्वी शॉ संघात आला आहे. सीएसकेने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.
दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टणम या आपल्या नव्या होम ग्राऊंडवर पहिला सामना खेळणार आहे. पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 बद्दल बोलायचे तर, चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज हा संघ संतुलित दिसत आहे. त्यात बदल होण्याची शक्यता नाही. तर दिल्ली संघात काही बदल केल्या जाऊ शकतात. हे काय बदल असतील हे सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.