DC vs GT IPL 2024 : दिल्लीच्या घरच्या मैदानावर भिडणार गुजरात! प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंत अन् गिलची लागणार कस

Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स - गुजरात टायटन्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये आज (ता. २४) आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे.
Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11
Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11sakal
Updated on

Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स - गुजरात टायटन्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये आज (ता. २४) आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दिल्लीने तीन, तर गुजरातने चार विजय मिळवले असून दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहावी, यासाठी विजय आवश्‍यक असणार आहे.

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत व गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या दोन्ही खेळाडूंच्या नेतृत्वाचा याप्रसंगी कस लागणार आहे. १७ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे झालेल्या लढतीत दिल्लीने गुजरातचा डाव ८९ धावांमध्ये गारद केला होता. दिल्लीने ही लढत सहा विकेट राखून जिंकली होती. आता गुजरातचा संघ या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11
IPL 2024 CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसचा शतकी उलटवार ; लखनौचा चेन्नईवर सनसनाटी विजय

दिल्लीने लखनौ व गुजरातविरुद्ध विजय मिळवल्यानंतर हैदराबादचा सामना केला. मात्र, घरच्या मैदानावर खेळताना त्यांचा ६७ धावांनी पराभव झाला. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत घसरणही झाली. हैदराबादविरुद्धच्या लढतीत कर्णधार रिषभ पंतच्या निर्णयांवर चोहोबाजूंनी टीकाही करण्यात आली. नाणेफेक जिंकून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. उत्तरार्धात मैदानावर दव पडेल आणि त्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचण निर्माण होईल, हे डोळ्यांसमोर ठेवून पंतने घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. हैदराबादने चक्क २६६ धावांचा डोंगर उभारला.

हैदराबादविरुद्धच्या लढतीत पंतने ललित यादवच्या हाती दुसऱ्याच षटकात चेंडू सोपवला. हैदराबादने सहा षटकांत १२५ धावांचा विक्रमी पाऊस पाडला. या लढतीत स्वत: पंतला फलंदाजीत चुणूक दाखवता आली नाही. जेक फ्रेसर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले; पण मोठ्या खेळीपासून दोघेही दूर राहिले. गोलंदाजी विभागातही दिल्लीकडून निराशा झाली. खलील अहमदच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून येतो. ॲनरिक नॉर्कियाला या मोसमात सूरच गवसलेला नाही. इशांत शर्माने दुखापतीमुळे मागील लढतीमधून माघार घेतली होती. त्याच्या पुनरागमनाची वाट बघितली जात आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans Playing 11
Marcus Stoinis CSK vs LSG : स्टॉयनिसनं सीएसकेवर फिरवला वरवंटा; चेपॉकचा किल्ला ढासळला

कुलदीप सर्वोत्तम गोलंदाज

दिल्लीकडून कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने पाच सामन्यांमधून दहा फलंदाज बाद केले आहेत. हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याने आठ चेंडूंवर हैदराबादला एकही धाव काढू दिली नाही; पण त्याच्याच गोलंदाजीवर सर्वाधिक सात षटकार मारण्यात आले. याचाच अर्थ त्यालाही गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

गिल, सुदर्शनकडून पुन्हा आशा

गुजरातच्या फलंदाजीची मदार कर्णधार शुभमन गिल (२९८ धावा) व साई सुदर्शन (२६९ धावा) यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा असणार आहे. राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा व विजय शंकर या फलंदाजांना मधल्या फळीत दिल्लीच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.

मोहित, राशीद, साईकिशोर ठरताहेत प्रभावी

गुजरातने यंदाच्या आयपीएल मोसमात संमिश्र कामगिरी केली आहे; पण मोहित शर्मा (१० विकेट), राशीद खान (८ विकेट) व साई किशोर (६ विकेट) यांनी गोलंदाजीत सातत्याने चमकदार खेळ केला आहे. उमेश यादवने सात फलंदाज बाद केले आहेत; पण त्याच्या गोलंदाजीवर १०.५५च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. नूर अहमदा यानेही पाच फलंदाज बाद करताना यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.