IPL 2024 हंगामातील सर्वात खतरनाक बॉल…. 35 वर्षाच्या इशांत शर्मानं रसेलला घालायला लावलं लोटांगण! Video Viral

Ishant Sharma on Andre Russell : कोलकता नाईट रायडर्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका बुधवारीही कायम राहिली.
Ishant Sharma on Andre Russell
DC vs KKR Match 16 Ishant Sharma on Andre Russell News Marathisakal
Updated on

DC vs KKR Match 16 Ishant Sharma on Andre Russell : कोलकता नाईट रायडर्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका बुधवारीही कायम राहिली. सुनील नारायण (८५ धावा, १/२९) व आंद्रे रसेल (४१ धावा व १/१४) यांची अष्टपैलू चमक आणि मिचेल स्टार्क (२/२५), वैभव अरोरा (३/२७), वरुण चक्रवर्ती (३/३३) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकता संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर १०६ धावांनी दणदणीत विजय साकारला.

Ishant Sharma on Andre Russell
DC vs KKR : पंत लाज वाचवण्यासाठी झुंजला! तरी दिल्लीला केकेआरविरूद्ध कमी पडल्या 106 धावा

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी 18 षटकार आणि 22 चौकार मारले. पण याच सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलच्या हंगामातील सर्वात खतरनाक बॉल टाकला. इशांत शर्माने 3 षटकात 43 धावा दिल्या मात्र त्याच्या एका चेंडूने खळबळ उडवून दिली. त्याने 20 व्या षटकात हा चेंडू टाकला.

Ishant Sharma on Andre Russell
IPL 2024 DC vs KKR : पंत - स्टब्जची झुंजार अर्धशतके तरी केकेआरने दिल्लीचा केला मोठा पराभव

या सामन्यात रसेल खूपच आक्रमक दिसला. त्याने 18 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या होत्या पण त्यानंतर इशांतने एक चेंडू टाकला ज्याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. इशांत शर्माने रसेलला उत्कृष्ट यॉर्कर टाकले. चेंडू खेळताना रसेलही खेळपट्टीवर पडला. रसेलला इशांतचा हा बॉल इतका आवडला की, बोल्ड झाल्यानंतर त्याने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

या चेंडूशिवाय या सामन्यात इशांत शर्मा काही विशेष करू शकला नाही. त्याच्या दुसऱ्याच षटकात इशांत शर्माने 26 धावा दिल्या आणि डावखुरा फलंदाज सुनील नरेनने त्याला मारले. नरेनने त्या षटकात 3 षटकार आणि 2 चौकार लगावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.