IPL 2022 : पदार्पण करणाऱ्या पोरानं लखनौच्या तगड्या बॅट्समनला पाणी पाजलं

Debutant Kuldeep Sen Fiery Spell Rajasthan Royals beat Lucknow Super Giants
Debutant Kuldeep Sen Fiery Spell Rajasthan Royals beat Lucknow Super GiantsESAKAL
Updated on

मुंबई : आयपीएलच्या 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 3 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावांची गरज असताना राजस्थानच्या डेब्युटन कुलदीप सेनने (Kuldeep Sen) टिच्चून मारा केला. राजस्थानने ठेवलेले 166 धावांचे आव्हान लखनौच्या बलाढ्य फलंदाजीला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंतच मजल मरता आली. स्टॉयनिसने 17 चेंडूत 38 धावांची खेळी करत सामन्यात रंगत आणली मात्र लखनौचा विजय अवघ्या 3 धावानी दूर राहिला.

Debutant Kuldeep Sen Fiery Spell Rajasthan Royals beat Lucknow Super Giants
VIDEO | RR vs LSG : लखनौ जिंकता जिंकता हरली; पाहा Highlights

राजस्थानचे 166 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने धक्का दिला. त्याने कर्णधार केएल राहुलचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ कृष्णाप्पा गौतमला देखील पायचीत बाद करत लखनौची अवस्था 2 बाद 1 धाव अशी केली. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जेसन होल्डरला बाद केले.

दरम्यान, क्विंटन डिकॉक आणि दीपक हुड्डाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 25 धावा करणाऱ्या हुड्डाचा अडसर कुलदीप सेनने दूर केला. पाठोपाठ युझवेंद्र चहलने आयुष बदोनीला बाद करत लखनौची अवस्था 5 बाद 74 धावा अशी केली. दरम्यान, 39 धावा करून एका बाजूने किल्ला लढवणारा डिकॉकही चहलची शिकार झाला.

Debutant Kuldeep Sen Fiery Spell Rajasthan Royals beat Lucknow Super Giants
अश्विनने 'रिटायर्ड आऊट' होऊन स्वतःची इतिहासात केली नोंद

लखनौची अवस्था 6 बाद 101 धावा झाली असताना आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या क्रुणाल पांड्याला साथ देण्यासाठी मार्कस स्टॉयनिस आला होता. मात्र 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने क्रुणाल पांड्याचा 22 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर लखनौला ज्यावेळी 18 चेंडूत 49 धावांची गरज होती त्यावेळी स्टॉयनिसने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र चहलने एका षटकारानंतर चमिराला बाद करत चांगले कमबॅक केले. मात्र आवेश खानने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत 18 व्या षटकात 15 धावा वसूल केल्या. आता 12 चेंडूत विजयासाठी 34 धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाने 19 व्या षटकात 19 धावा दिल्या. त्यामुळे आता लखनौसमोर 6 चेंडूत विजयासाठी 15 धावांची गरज होती. त्यावेळी सॅमसनने आयपीएलची पहिलीच मॅच खेळणाऱ्या कुलदीप सेनच्या हातात चेंडू दिला. त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत फक्त 11 धावा दिल्या. अखेर स्टॉयनिसची 17 चेंडूत केलेली 38 धावांची खेळी वाया गेली.

Debutant Kuldeep Sen Fiery Spell Rajasthan Royals beat Lucknow Super Giants
IPL ड्रामा! तीन चेंडूत तीन वेळा बाद झाला अजिंक्य, पण...

तत्पर्वी, आयपीएलच्या 20 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करवी लागलेल्या राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर 165 धावा उभारल्या. लखनौच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानची सुरूवात खराब झाली. आवेश खान, जेसन होल्डर आणि कृष्णाप्पा गौतमने त्यांची अवस्था 4 बाद 67 धावा अशी केली होती.

मात्र त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि शिमरॉन हेटमायरने किल्ला लढवत पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, स्लॉग ओव्हर सुरू झाल्यानंतर हेटमायरने हिटिंग सुरु केली तर अश्विनने रिटायर्ड आऊट होत रियान परागला फलंदाजीला पाचारण केले. अश्विनने 23 चेंडूत 24 धावा केल्या. हेटमायरने 36 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी करत राजस्थानला 20 शटकात 6 बाद 165 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.