हुड्डा म्हणतो, माझे प्राधान्य IPL Auction ला नाही तर 6 फेब्रुवारीला!

Deepak Hooda pick CSK but  says his first priority to play in west indies series
Deepak Hooda pick CSK but says his first priority to play in west indies series esakal
Updated on

धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त फिरकी गोलंदाजी करणाऱ्या दीपक हुड्डाची (Deepak Hooda) नुकतीच वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. याचबरोबर तो आयपीएल 2022 च्या मेगा लिलावातील (IPL Mega Auction 2022) एक महत्वाचा खेळाडू असणार आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक हुड्डाला त्याला कोणत्या आयपीएल संघात (IPL Team) खेळायला आवडेल असे विचारण्यात आले. मात्र त्याने आधी माझे प्राधान्य हे वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणार आहे असे स्पष्ट केले.

Deepak Hooda pick CSK but  says his first priority to play in west indies series
VIDEO : दिनेशची बल्ले बल्ले! 500 च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

दीपक हुड्डा म्हणाला, 'असं काही नाही. सध्या तरी माझे प्राधान्य हे 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल लिलावावर (IPL Auction) नाही तर 6 तारखेपासून सुरू होणाऱ्य वेस्ट इंडीजविरूद्धच्या (India vs West Indies) मालिकेला आहे. मला फक्त खेळायचं आहे. पण, मात्र माझा वैयक्तिक आवडता संघ हा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आहे. मी धोनीच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्सुक मुलासारखा आहे.' असे वक्तव्य करून दीपक हुड्डाने एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेकडून (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

Deepak Hooda pick CSK but  says his first priority to play in west indies series
ग्रीक फुटबॉलपटूचा रूग्णवाहिकेअभावी मैदानातच मृत्यू

दीपक हुड्डाने काही वेळा त्याचे एमएस धोनीबरोबर संभाषण झाल्याचे सांगितले. तो म्हणाला, 'मी एमएस धोनची चाहता आहे. मला त्याचे नेतृत्व आवडते. मी काही वेळा त्याच्याशी बोललो देखील आहे. मी यापूर्वी देखील भारतीय संघात निवडला गेलो होते. त्यावेळी धोनी भाई तिथं होता. त्यावेळी मी धोनीशी बोललो होतो आताही कधी भेटलो तर आम्ही बोलतो.'

दीपक हुड्डा हा दोन वेळा भारतीय टी २० संघात निवडला (Indian T20 Team) गेला होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला आशा आहे की वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.