नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2022) आपल्या कळपात अजून एका दिग्गज क्रिकेटपटूचा समावेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आज अजित आगरकरची (Ajit Agarkar) सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) म्हणून नियुक्ती केली. अजित आगरकर भारत आणि श्रीलंका मालिकेनंतर दिल्ली कॅपिटल्स सोबत जोडला जाणार आहे. तो सध्या या मालिकेत समालोचकाची भुमिका बजावणार आहे. (Delhi Capitals Appoints Ajit Agarkar as a Assistant Coach for IPL 2022)
अजित आगरकरची दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आगरकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आगरकर म्हणतो की, 'दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.'
तो पुढे म्हणाला की, 'मला संघाकडून खेळाडू म्हणून खेळण्याचे आणि त्याच संघात एक वेगळी जबाबदारी निभावण्याचे भाग्य लाभले आहे. मी याबाबत उत्सुक आहे. आमच्याकडे युवा आणि जबरदस्त संघ आहे. त्याचे नेतृत्व जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडू ऋषभ पंत करत आहे. संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हा तर या खेळातील दिग्गज व्यक्तीमत्व आहे. त्याच्यासोबत काम करण्यास मी आतूर आहे. काही खास आठवणी तयार करण्यासाठी मी उत्सुक आहे.'
भारताचा 44 वर्षाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने 288 वनडे सामने तर 58 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले होते. तो आता दिल्ली कॅपिटल्सच्या रिकी पाँटिंग, प्रविण आमरे (Pravin Amre) आणि जेम्स होप्स या कोचिंग टीमबरोबर काम करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.