GT vs DC : पॉवर प्लेमध्येच गुजरात हरली! दिल्लीच्या वेगवान माऱ्यासमोर घरच्या मैदानावरच टाकल्या नांग्या

Rishabh Pant
Gujarat Titans vs Delhi Capitals IPL 2024ESAKAL
Updated on

Gujarat Titans vs Delhi Capitals IPL 2024 : गुजरात टायटन्सला त्यांच्यात घरच्या मैदानावर लोळवायला दिल्ली कॅपिटल्सला फार मजा वाटते. दिल्लीचं गुजरातविरूद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवरील विनिंग पर्सेंटेज हे भारी आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात देखील दिल्लीनं आपली परंपरा कायम राखत गुजरातचा त्यांच्याच घरात घुसून मानहानिकारक पराभव केला.

नाणेफेक जिंकल्यानंतर सहाजिकच ऋषभ पंतनं गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. लाईट्समध्ये चेस करण्यात अडचण येणार नाही असं यामागचं थिंकिंग होतं. मात्र सामना सुरू झाला अन् दिल्लीचं हे थिंकिंग कसं चुकीचं आहे हेच गुजरातच्या फलंदाजांनी दाखवून दिलं.

गुजरातच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच दिल्ली कॅपिटल्स सामना असा थाळीत सजवून दिला होता. कारण इशांत शर्मा आणि मुकेश कुमार या भारतीय वेगवान जोडीनं गुजरातच्या फलंदाजांना नवीन चेंडूवर सळो की पळो करून सोडलं.

Rishabh Pant
GT vs DC IPL 2024 : दिल्लीनं गुजरातचा विषय 9 षटकातच संपवला; होम ग्राऊंडवर गिलला पंतनं दिलं मात

इशांतनं आपल्या अनुभवाचा वापर करत शुभमन गिलला 8 धावांवर माघारी धाडलं. पाठोपाठ मुकेशनं वृद्धीमान साहाचा त्रिफळा उडवत गुजरातचा दुसरा सलामीवीरही टिपला. या धक्क्यातून गुजरात सावरण्याचा प्रयत्न करत होती. तोच सुमित कुमारनं सेट होऊ पाहणाऱ्या सुदर्शनला धावबाद करत गुजरातचं टेन्शन वाढवलं.

गुजरातचे तीन शिलेदार 28 धावात गारद झाले होते. स्लॉग ओव्हर किंग म्हणून ओळखला जाणारा डेव्हिड मिलर क्रीजवर आला होता. दुखापतीवर मात करत फिट झालेल्या मिलरला मात्र इशांतनं विश्रांती दिली. त्याला 2 धावांवर बाद करत गुजरातची अवस्था 5 षटकात 4 बाद 30 धावा अशी केली.

Rishabh Pant
IPL 2024: शाहरुख खानने दाखवली खिलाडूवृत्ती, शतक ठोकत KKR ला हरवणाऱ्या बटलरचं केलं अभिनंदन, पाहा Video

डेव्हिड मिलर बाद झाल्यानंतर गुजरातच्या संघानं कच खाल्ली. दिल्लीच्या वेगवान माऱ्याला आता फिरकीची साथ लाभली. ट्रिस्टन स्टब्स या पार्ट टाईम स्पिनरनं एका धावाच्या अंतरात दोन बळी घेत गुजरातची अवस्था 6 बाद 48 धावा अशी केली. यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी गुजरातची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र अक्षरनं तेवतियाला हात खोलण्याची संधीच दिली नाही. पाठोपाठ मुकेश कुमार अन् खलीलनं उरल्या सुरल्या गुजरातची फडाशा पाडला. एकाकी झुंज देणाऱ्या राशिदनं 31 धावा केल्या खऱ्या मात्र मुकेशनं त्याला स्लॉग ओव्हर काही खेळू दिल्या नाहीत. गुजरातकडून तीनच फलंदाज डबल डिजीटमध्ये गेले.

अखेर मुकेशनं नूर अहमदची दांडी गुल करत आपली तिसरी शिकार केली अन् गुजरातचा डाव 89 धावात संपवला.

Rishabh Pant
GT vs DC: ज्युनियर पॉटिंग विरुद्ध तेवतिया! दिल्ली-गुजरात आमने-सामने येण्यापूर्वीच अहमदाबादमध्ये रंगली खास लढत, पाहा Video

दिल्लीसमोर 89 धावांच तोकडं आव्हान होतं. मात्र दिल्लीनं देखील गाफील न राहता निवांत खेळ केला नाही. त्यांनी पहिल्या चेंडूपासून धुलाई करत आपलं नेट रनरेट आज आपण वाढवणार हा निर्धार दाखवला. त्यांच्या सलामीवीरांनी 2 षटकात 25 धावा चोपल्या. जॅकनं तर 10 चेंडूत 20 धावा केल्या होत्या.

मात्र स्पेंसर आणि संदीप वॉरियनरनं दिल्लीचा उधलेला वारू रोखण्याचा प्रयत्न केला. स्पेन्सरनं आधी जॅखला त्यानंतर वॉरियनं पृथ्वी शॉला बाद केलं. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर गुजरात कडवी फाईट देणार असं वाटलं. मात्र डावखुऱ्या अभिषेक पोरेल अन् शे होपनं तडाखेबाज फलंदाजी करत वातावरणच टाईट करून टाकलं.

त्यात संदीपनं कशीबशी पोरेलची विकेट घेतली. त्यानंतर राशिदनं शे होपची 19 धावांची खेळी शांत केली. मात्र तोपर्यंत दिल्लीनं पॉवर प्लेमध्ये 67 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर पंतनं झटपट मॅच संपवत दिल्लीला पॉईंट टेबलमध्ये 9 व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहचवलं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.