मुंबई : आयपीएलच्या 34 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध भिडणार आहे. हा सामना आधी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार होता. मात्र दिल्लीच्या संघातील एका पाठोपाठ एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Corona) आढळून येत असल्याने दिल्लीचे पुण्यातील सामने मुंबईमध्ये हलवण्यात आले. आजचा राजस्थान विरूद्धचा सामना वानेखेडेवर होणार आहे. दरम्यान, राजस्थान विरूद्धच्या सामन्यापूर्वीच दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Pointing) हा संघासोबत वानखेडे स्टेडियमवर दिसणार नाहीत.
दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला संघापासून वेगळे करून विलगीकरणात (Isolated) ठेवले आहे. त्याच्या कुटुंबातील (Ricky Pointing Family) एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रिकी पाँटिंग हा संघासोबत प्रवास करणार नाही. तो राजस्थान विरूद्धच्या सामन्यावेळी दिल्लीच्या डगाऊटमधून सामन्याची सूत्रे हलवू शकरणार नाही.
गुरूवारी आणि शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ, सहयोगी स्टाफ आणि कुटुंबियांची रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) करण्यात आली होती. दरम्यान, इंडियन्स एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या चाचण्यामंध्ये रिकी पाँटिंगची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र त्याच्या कुटुंबातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याला छोट्या कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
पाँटिंगच्या अनुपस्थितीत दिल्लीचा सपोर्ट स्टाफ प्रविण आमरे, अजित आगरकर, जेम्स होप्स आणि शेन वॉट्सन हे दिल्लीची राजस्थान विरूद्धची रणनिती ठरवणार आहेत. दिल्लीचा संघ काही विदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोरनाच्या गर्तेत आडकला. संघाचा अष्टपैलू खेळाडू टीम सैफर्ट आणि मिशेल मार्श यांच्यासह चार सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामुळे बीसीसीआयने दिल्लीच्या संघाचे रोज टेस्टिंग सुरू केले आहे. यात गुरुवारी चार चाचण्या तर शुक्रवारी दोन चाचण्या करण्यात आल्या.
दरम्यान, पंजाब विरूद्धच्या सामना कोरोनामुळे अनिश्चिततेच्या गर्तेत अडकला होता. मात्र सामना झाला आणि दिल्लीने पंजाबचा 9 विकेट राखून पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.