'IPL 2024 स्पर्धा तोच संघ जिंकेल, जो...', दिल्लीचा कोच रिकी पॉटिंगने केली भविष्यवाणी

Ricky Ponting: दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने आयपीएल 2024 स्पर्धेच्या संभाव्य विजेत्याबद्दल अंदाज व्यक्त केले आहेत.
Ricky Ponting | IPL 2024
Ricky Ponting | IPL 2024Sakal
Updated on

Delhi Capitals News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 16 एप्रिलपर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील अनेक सामने रोमांचक झाले आहेत. विशेष म्हणजे अद्याप आयपीएल 2024 चा पहिला टप्पाही संपलेला नसताना 500 पेक्षा अधिक षटकार मारण्यात आले आहेत, तर 6 शतकेही झाले आहेत.

इतकेच नाही, तर आयपीएलमधील सर्वोच्च 3 धावसंख्याही याच हंगामात झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक संघांनी 200 धावांचा टप्पा पार केला आहे, तर मंगळवारी (16 एप्रिल) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 224 धावांचे आव्हान यशस्वी पूर्णही केले. आता याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेही भाष्य केले आहे.

सोमवारी (15 एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 20 षटकात 287 धावांचा डोंगर उभारला होता. याच्या प्रत्युत्तरात बेंगळुरूनेही 262 धावांपर्यंत मजल मारली, मात्र विजयासाठी त्यांना 25 धावा कमी पडल्या.

याच सामन्यात ट्रेविस हेडने 41 चेंडूत 102 धावांची खेळी हैदराबादसाठी केली होती. याचेच उदाहरण देतच पाँटिंगने म्हटले आहे की मोठ्या धावा करणारा संघ यंदा आयपीएल 2024 स्पर्धा जिंकेल.

Ricky Ponting | IPL 2024
Sunil Narine: '...त्याने सर्वांना ब्लॉक केलंय', नारायणच्या T20 वर्ल्डकप खेळण्याबाबत विंडिज कर्णधार काय म्हणाला?

दिल्लीला बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादला सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पॉटिंग म्हणाला, 'पाहा खेळ कुठे जात आहे. नक्कीच सनरायझर्स हैदराबादने दोन मोठ्या धावसंख्या उभारल्या. तसेच केकेआरनेही २६० हून अधिक धावा आमच्याविरुद्ध केल्या होत्या.'

'मला वाटते की इम्पॅक्ट प्लेअर मोठा प्रभाव पाडणार आहे. तुम्ही ट्रेविसने त्यादिवशी कशी फलंदाजी केली पाहिली असेल, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या नंतर येणाऱ्या खेळाडूंवर विश्वास नसतो, तोपर्यंत तुम्ही अशी फलंदाजी करू शकत नाही.'

Ricky Ponting | IPL 2024
IPL 2024: 'हरण्यासाठी पात्र नव्हतो, पण...' KKR च्या पराभवानंतर शाहरुखचे ड्रेसिंग रुममध्ये 'चक दे' स्टाईल भाषण, पाहा Video

पॉटिंग पुढे म्हणाला, 'बऱ्याचदा आयपीएल, बीग बॅश लीग अशा स्पर्धा चांगली गोलंदाजी फळी असलेल्या संघांनी जिंकल्या आहेत. पण यंदाच्या आयपीएल ज्या प्रकारे होत आहे आणि जे वेगळे नियम आहेत, त्यावरून असे वाटते की यंदाची आयपीएल कदाचित तोच संघ जिंकेल, जो गोलंदाजांवर आक्रमण करेल आणि मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.

'मला वाटते की जो संघ अधिक आक्रमकतेने फलंदाजी करेल तो संघ यंदा आयपीएल जिंकेल.'

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सबद्दल सांगायचे झाले, तर संघाला 6 पैकी 2 सामनेच अद्याप जिंकता आलेले असून गुणतालिकेत संघ 9 व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.