IPL 2024: दुष्काळात तेरावा! दिल्लीचा प्रमुख ऑलराऊंडर होणार संपूर्ण हंगामातून बाहेर? कोचनेच दिली अपडेट

Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सला एकापाठोपाठ एक पराभवांबरोबरच खेळाडूंच्या दुखापतींमुळेही धक्के बसत आहेत.
Sakal
Delhi Capitals | IPL 2024Sakal
Updated on

Delhi Capitals IPL News: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्सला रविवारी (7 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध 29 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा दिल्लीचा या हंगामातील चौथा पराभव होता. त्यामुळे सध्या दिल्ली गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.

त्यातच आता दिल्लीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केवळ दिल्लीलाच नाही, तर ऑस्ट्रेलिया संघाही चिंतेत आहे. कारण अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. मार्श जूनमध्ये होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करणार आहे.

दरम्यान मार्श सध्यातरी साधारण आठवडाभरासाठी क्रिकेट खेळणार नसल्याचे दिल्ली संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी सांगितले आहे.

Sakal
IPL 2024 : डबल-हेडरनंतर Points Table मोठी उलथापालथ! मुंबईने घेतली झेप, RCB अडचणीत, CSK लाही धक्का

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर आमरे यांनी सांगितले की 'आमचे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत आणि मिचेल मार्शबाबत चिंता आहे. तो स्कॅनसाठी गेला असून फिजिओ आम्हाला एका आठवड्यात त्याच्याबाबत रिपोर्ट देतील. त्यानंतर आम्हाला खऱ्या परिस्थितीबद्दल कल्पना येईल. तो या हंगामात खेळू शकेल की नाही, हे येणाऱ्या रिपोर्टवर अवलंबून आहे.'

मार्शने आत्तापर्यंत दिल्लीकडून 17व्या आयपीएल हंगामात 4 सामने खेळले आहेत, पण अद्याप तरी त्याला फारशी छाप पाडता आलेली नाही. त्याने 4 सामन्यात 61 धावा केल्या. तसेच 1 विकेट घेतली.

दिल्लीने त्यांचा चौथा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना मार्शला दुखापत झाली. त्याने या सामन्यात 3 षटकात 37 धावा देताना 1 विकेट घेतली. पण तो नंतर फलंदाजीला आला होता. मात्र शुन्यावरच माघारी परतला. दरम्यान, त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समजत आहे.

Sakal
T20 World Cup : T-20 वर्ल्ड कपमध्ये पंत-सूर्याच्या खेळण्यावर टांगती तलवार... 'या' खेळाडूमुळे होणार पत्ता कट?

दरम्यान, मार्शला आयपीएल दरम्यान दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो अनेकदा आयपीएळमध्ये खेळताना दुखापत झाली आहे.

तथापि, दिल्लीला केवळ मार्शच्या दुखापतीचीच नाही, तर इतर खेळाडूंच्या दुखापतीचीही चिंता आहे. कुलदीप यादव देखील मांडीजवळ झालेल्या छोट्या दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना मुकला आहे.

तो आणखी 1-2 सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्याचे आमरे यांनी सांगितले आहे, याशिवाय मुकेश कुमारही दोन सामन्यांत खेळलेला नाही, पण आता तो दिल्लीच्या पुढच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Sakal
IPL 2024 Delhi Capitals : चार पराभवानंतर दिल्ली संघाने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूची वाइल्ड कार्ड एन्ट्री

आमरे म्हणाले, 'आम्ही जिंकायला सुरुवात करायला हवी होती, पण आम्हाला काही खेळाडूंच्या दुखापतीचा धक्का बसला. पहिल्या सामन्यात इशांत दोन षटकात गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर मुकेश कुमारलाही दुखापत झाली.'

'कुलदीपही तीन सामने खेळलेला नाही आणि आता मार्शला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. ते आमचे प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळे त्याच्याजागेवर खेळायला येणारे खेळाडू त्यांच्याच इतके प्रभावी नाहीत. कारण ते ए खेळाडू विरुद्ध बी खेळाडू असे समीकरण आहे.'

दरम्यान, दिल्लीचा संघ विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना सहावा सामना 12 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.