Prithvi Shaw IPL 2024 : पृथ्वी शॉला ही गोष्ट कळायला हवी... अनिल कुंबळेकडून दिल्लीच्या सलामीवीराला कानपिचक्या

Prithvi Shaw IPL 2024
Prithvi Shaw IPL 2024esakal
Updated on

Prithvi Shaw IPL 2024 Anil Kumble : आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायजींना आपले रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी 26 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करायची होती. दिल्ली कॅपिटल्सने देखील आपली रिटेंशन लिस्ट सादर केली असून सलामीवीर आणि सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या पृथ्वी शॉला रिटेन केलं आहे.

पृथ्वी शॉसाठी गेला आयपीएल हंगाम हा वाईट गेला होता. त्याला आठ सामन्यात 13.25 च्या सरासरीने फक्त 106 धावाच करता आल्या होत्या. त्याचे स्ट्राईक रेट देखील 125 च्या आतच होतं. यामुळेच त्याला गेल्या हंगामात अनेक सामन्यातून वगळण्यात आलं. तरी देखील दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन करत त्याच्यावर विश्वास दाखवला.

Prithvi Shaw IPL 2024
Pakistan Cricketer Palestine flag : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर आझमला पॅलेस्टिन प्रेम भोवलं; पीसीबीनेच केली मोठी कारवाई?

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने जिओ सिनेमावर बोलताना पृथ्वी शॉबद्दल एक महत्वाचं वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'पृथ्वी शॉला हे कळायला हवं की त्याच्या सोबत खेळलेले खेळाडू हे खूप पुढे निघून गेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शुभमन गिल! तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक झाला आहे.'

'संघ व्यवस्थापन त्याचा दीर्घकाळासाठी विचार करत आहे. पृथ्वी शॉने मात्र ही संधी गमावली. यंदाचा हंगाम हा पृथ्वी शॉसाठी पुनरगामनाचा किंवा कारकीर्द संपवणारा ठरू शकतो.'

पृथ्वी शॉने काऊन्टी क्रिकेट खेळताना 153 चेंडूत 244 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यात 28 चौकार आणि 11 षटकार मारले होते. त्याने 129 चेंडूतच आपलं द्विशतक धावफलकावर लावलं होतं. फक्त 4 सामन्यातच शॉने 152.66 च्या स्ट्राईक रेट आणि 143 च्या सरासरीने धावा ठोकल्या.

Prithvi Shaw IPL 2024
Rinku Singh : त्याला फलंदाजी करण्यासाठी येताना पाहिलं अन्... सूर्याला रिंकूमध्ये कोणतं महान व्यक्तीमत्व दिसलं?

वयाच्या विशीत असलेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आपल्या खराब फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. दिल्लीकडून खेळताना अनेकवेळा त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच वापर केला गेला. आधुनिक क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. टी 20 मध्ये तर क्षेत्ररक्षण हे सामन्याचे चित्र पालटू शकते.

याबाबत बोलताना कुंबळे म्हणाला की, 'पृथ्वी शॉला त्याच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या फिटनेसबाबत कायम चर्चा होते. त्याच्या क्रिकेटिंग स्कीलबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. त्याच्याकडे विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे.'

'तो एकहाती सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. तो तरूण आहे मात्र त्याने त्याच्या फिटनेसवर काम केलं पाहिजे. जर सौरव गांगुली, डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग त्याला फिटनेसकडे लक्ष देण्यास भाग पाडू शकत नसतील तर ही खूप मोठी समस्या आहे.'

पृथ्वी शॉ हा 2018 पासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. त्याने 71 आयपीएल सामन्यात 23.86 च्या सरासरूने धावा केल्या असून त्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.