IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतची टीम दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. पॉइंट टेबलमध्ये दिल्लीची स्थिती आधीच खराब आहे. आयपीएलच्या या हंगामात दिल्लीने 6 सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी फक्त 2 जिंकले आहेत. डीसी संघ 2 सामने जिंकून गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे.
यादरम्यान डीसीचा दिग्गज खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू आयपीएल 2024 मध्येच सोडून आपल्या देशात परतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सला या स्पर्धेतील पुढील सामना 17 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. पंतच्या सेनेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण दिल्लीला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवायची आहे.
मात्र यादरम्यान दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. डीसी अष्टपैलू मिचेल मार्श आपल्या देशात ऑस्ट्रेलियाला परतला आहे. मार्शला या आयपीएल हंगामात आतापर्यंत केवळ 4 सामने खेळला. यानंतर तो दुखापतीमुळे 2 सामन्यांतून बाहेर होता. तो लवकरच पुनरागमन करू शकेल, असे वाटत होते, पण आता मार्श दुखापतीवर उपचार घेण्यासाठी त्याच्या देशात ऑस्ट्रेलियाला परतला आहे. दुखापतीतून तो लवकर सावरला तर तो पुनरागमन करेल, अन्यथा तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडेल.
या अष्टपैलू खेळाडूने दिल्लीसाठी या हंगामात खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 160 च्या स्ट्राइक रेटने 61 धावा केल्या आहेत. आणि यादरम्यान त्याने एक विकेटही घेतली. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो गरजेच्या वेळी गोलंदाजीतही संघाला साथ देतो.
अशा स्थितीत तो गेल्याने पंतच्या सेनेला मोठा फटका बसला आहे. आता मार्शशिवाय आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्स कशी कामगिरी करते हे पाहायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.