दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादच्या 266 धावांच्या प्रत्युत्तरात दमदार सुरूवात केली. पृथ्वी शॉ, फ्रेसर मॅग्कर्ग आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीला पॉवर प्लेमध्ये शतकी मजल मारून दिली.
मात्र हैदराबादच्या भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि पॅट कमिन्स यांनी चांगला मारा करत दिल्लीला ठराविक अंतराने धक्के देत त्यांची धावगती कमी केली. फ्रेसरने 18 चेंडूत 65 धावा अन् अभिषेकने 22 चेंडूत 42 धावा केल्यानंतर मधल्या फळीत ऋषभ पंतने देखील दमदार फलंदाजी केली.
मात्र टी नटराजनने 4 विकेट्स घेत दिल्लीची लोअर मिडल ऑर्डर उडवली. नटारजनने 19 व्या षटकात एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. अखेर दिल्लीचा डाव 199 धावात गुंडाळला गेला.
शाहबाज अहमदनं 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याला नितीश रेड्डीने 27 चेंडूत 37 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी पाठोपाठ धक्के दिल्यानंतर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदने डाव सावरत हैदराबादला 14.4 षटकात 200 धावांचा टप्पा पार करून दिला. आयपीएल इतिहासात आरसीबीनंतर सर्वात कमी षटकात 200 धावा करणारा हैदराबाद दुसरा संघ ठरला. आरसीबीने 2016 मध्ये पंजाब किंग्जविरूद्ध 14.1 षटकात 200 धावा ठोकल्या होत्या.
कुलदीप यादवने पॉवर प्लेमध्ये तुफान हाणामारी करणाऱ्या हैदराबादची हवा टाईट केली. त्यानं हेड अभिषेक शर्मा आणि मार्करमला बाद करत दिल्लीला मोठा दिलासा दिला.
हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आयपीएलच्या 17 व्या हंगामात धमाका केला. त्यांनी 5 षटकात हैदराबादच्या 100 धावा धावफलकावर लावल्या. हेडने 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं तर अभिषेक शर्माने 10 चेंडूत 40 धावा केल्या. पॉवर प्लेच्या पहिल्या 5 षटकातच संघाचे शतक पूर्ण करणारे एसआरएच हा पहिला संघ ठरला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दिल्लीला सामना सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटं आधी मोठा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या पाठीला दुखापत झाली असून त्याच्या ऐवजी संघात नॉर्खियाला संधी मिळाली आहे.
आयपीएलच्या 35 व्या सामन्यात आज सनराईजर्स हैदराबादने दिल्लीचा त्यांच्याच घरात 67 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या होत्या. दिल्लीला 19.1 षटकात सर्वबाद 199 धावाच करता आल्या. दिल्लीकडून फ्रेसर मॅक्गर्गने सर्वाधिक 65 धावा केल्या.
ट्रॅविस हेडने 32 चेंडूत 89 धावांची तर अभिषेक शर्माने 12 चेंडूत 46 धावांची खेळी करत हैदराबादला दमदार सलामी दिली.
त्यानंतर कुलदीप यादवनं भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहबाज अहमदने 59 धावांची खेळी करत हैदराबादला 266 धावांपर्यंत पोहचवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.