DC vs GT : कवडी मोलाच्या 225 धावा! विजयाच्या मार्जिनवर पडलाय 'इम्पॅक्ट'

Rishabh Pant
DC vs GT IPL 2024 esakal
Updated on

Delhi Capitals Won By Only 4 Runs Despite Scoring 225 Runs Against Gujarat Titans IPL 2024 : बरं झालं नाणेफेक जिंकलो नाही. मी फलंदाजीच करणार होतो असं दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन टॉस झाल्या झाल्या बोलला होता. त्यानं आपलं म्हणणं खरं करून दाखवलं. दिल्लीची सुरूवात जरी खराब झाली असली तरी शेवट मात्र गोड झाला.

बढती मिळालेल्या अक्षर पटेलनं जोमानं काम करत 43 चेंडूत 66 धावांची खेळी करत आपण या पदोन्नतीला लायक असल्याचं दाखवून दिलं. त्यानं ऋषभ पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी सुरू होती त्यावेळी दिल्ली फार तर 180 ते 190 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटलं होतं.

Rishabh Pant
DC vs GT : दिल्ली गुजरातच्या आवाक्याबाहेरच! राशिद शेवटपर्यंत लढला मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेश जिंकला

मात्र पुनर्जन्म झालेल्या ऋषभ पंतनं हंगामात धमाका करण्याचं सत्रच सुरू केलं आहे. त्यानं स्लॉग ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की तगडी म्हणवणारी जीटीची गोलंदाजी अत्यंत सुमार दिसू लागली.

पंतनं शेवटच्या षटकात डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्माला मोडीतच काढलं! पंतनं त्याच्या एकाच षटकात 31 धावा वसूल केल्या. दिल्लीनं थेट 224 धावांपर्यंत मजल मारली. या प्रवासात ट्रिस्टन स्टब्सनं 7 चेंडूत 26 धावा चोपून पंतची जबरदस्त साथ दिली.

Rishabh Pant
SRH vs RCB IPL 2024 : हैदराबाद 300 पार... हैदराबाद - बंगळुरू लढतीत होणार नवा विक्रम?

दिल्लीनं बघता बघता 225 चा आकडा टच केला होता. तंस पाहायला गेलं तर गुजरात इथंच मॅच हरली होती. मात्र नव्या दमाची पोरं नव्या पद्धतीनं टी 20 क्रिकेट खेळायलेत. या पोरांना 200 धावा म्हणजे किस झाड की पत्ती वाटतं.

गुजरातचा खंदा फलंदाज गिल स्वस्तात माघारी गेल्यानंतर वृद्धीमान साहा आणि साई किशोरनं गुजरातला 10 षटकात जवळपास शतकी मजल मारून दिली. याचबरोबर गुजरातनं पिक्चर अभी बाकी हैं चा संदेश दिल्लीला दिला होता.

गुजरातच्या रन चेसमधील या दमदार पहिल्या हाफनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी एक एक धक्के देत गुजरातचे रथी महारथी पॅव्हेलियनमध्ये पाठवायला सुरूवात केली. साई किशोर देखील 65 धावा करून बाद झाला. मात्र डेव्हिड मिलर नावाची किलर मशिन अजून क्रीजवर होती. त्यानं 25 चेंडूत 55 धावा ठोकत दिल्लीचे मनसुबे उधळून लावले.

Rishabh Pant
Yashasvi Jaiswal: ...अन् सेंच्युरीनंतर जयस्वालची ब्रायन लाराला धावत येत कडकडून मिठी, Video पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

सामना गुजरातच्या टप्प्यात आला होता. त्यात राशिद खान टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्यात माहीर! त्यानं शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज असताना मुकेश कुमारच्या पहिल्या दोन चेंडूतच दोन चौकारांसह 8 धावा वसूल केल्या.

गुजरातला 4 चेंडूत विजयासाठी 11 धावांची गरज असताना राशिदनं स्ट्राईक आपल्याकडं ठेवण्यासाठी दोन चेंडू वाया घालवले. आता सामना 2 चेंडू अन् 11 धावा असा आला. म्हणजे राशिदला आता दोन षटकारांची गरज होती. त्यानं पाचव्या चेंडूवर षटकार मारला अन् पंतच्या काळजात धस्स झालं. मात्र शेवटच्या चेंडूवर मुकेशनं राशिदला बाऊंड्री पार करून दिली नाही. दिल्लीनं सामना 4 धावांनी जिंकला.

दिल्लीनं पहिल्या डावात 225 धावा करूनही त्यांना सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत कष्ट उपसायला लागले. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला गेला नाही तोपर्यंत दिल्लीच्या विजयाची शाश्वती नव्हती. इम्पॅक्ट प्लेअरमुळं आता अशक्यही शक्य होऊ लागलं आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.