सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) आपली आयपीएल कारकिर्द ही रॉयल चॅलेंजर बेंगलोरमधून (Royal Challengers Bangalore) केली होती. यावेळी आरसीबीचा कर्णधार हा विराट कोहली (Virat Kohli) होती. देवदत्त पडिक्कलने क्रिकट्रॅकर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीच्या ग्रेटनेसचे (Greatness) एक उदाहरण दिले. देवदत्त पडिक्कलने आरसीबीकडून खेळताना दोन्ही हंगामात दमदार फलंदाजी केली होती. त्याने 2021 च्या हंगामात वानखेडेवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध 101 धावांची खेळी केली होती. यावेळी विराट, कॅमेरामन (Cameramen) आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात एक किस्सा झाला होता. या घटनेमुळे देवदत्त पडिक्कलला विराट किती ग्रेट आहे याची प्रचिती आली होती.
क्रिकट्रॅकर या वेबसाईटने शेअर केलेल्या व्हिडिओत देवदत्त पडिक्कल म्हणतो की, 'मला ही घटना चांगली आठवते. ज्यावेळी विराट कोहलीला कॅमेरा फॉलो करत होता त्यावेळी त्याने कॅमेरामनला सांगितले होते की त्याच्याकडे (देवदत्त) जा आज त्याने मोठी कामगिरी केली आहे. यानंतर ही घटना ज्या ज्या वेळी मला आठवते त्या त्या वेळी माझ्या अंगावर शहारे येतात.' देवदत्त पुढे म्हणाला की, 'मला त्या दिवसाबाबत सगळे व्यवस्थित आठवते. मी उभ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मी 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकू शकेन. मात्र मी ऐतिहासिक अशा वानखेडेवर शतक ठोकले. तेही विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यासारख्या खेळाडूंच्या समोर. हे माझ्यासाठी अद्भुत होते.'
आरसीबीकडून पाठोपाठ दोन हंगामात चांगल्या धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्कलसाठी भारतीय संघाचे दार देखील उघडले. त्याने गेल्या वर्षी भारतीय संघासोबत मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा देखील केली. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दोन टी 20 सामन्यात 9 आणि 29 धावा केल्या होत्या. भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या पडिक्कलने सांगितले की, 'भारताकडून खेळणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे. एका मुलाला क्रिकेट खेळायला आवडते त्याचे सर्वात मोठे ध्येय हे देशाकडून खेळणे हेच असते. त्यामुळे तो क्षण माझ्या आयुष्टातील सर्वात मोठा क्षण आहे. तसेच माझ्या कुटुंबियांसाठी देखील ही फार मोठी गोष्ट आहे. कारण माझ्या क्रिकेटसाठी आम्ही हैदराबादमधून बंगळुरूला शिफ्ट झालो होतो.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.