Devon Conway Ruled Out of IPL 2024 : आयपीएलचा निम्मा हंगाम जवळपास संपत आला आहे. काही संघांचा हंगाम चांगला चालला आहे, तर काही संघांचा हंगाम खूपच खराब आहे.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. ड्वेन कॉनवे आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. त्याच्या बदलीची घोषणाही संघाने केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
डव्हॉन कॉनवे नुकताच जखमी झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून सीएसकेकडून खेळत असलेल्या कॉनवेबद्दलच्या बातम्या आधीच आल्या होत्या की, तो किमान अर्धा हंगाम खेळू शकणार नाही. तो नंतर परतेल अशी अपेक्षा होती, पण आता बातमी आली आहे की तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेला आहे. 2023 आयपीएल मध्ये डव्हॉन कॉनवेने त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.
कॉनवेच्या अनुपस्थितीत सीएसकेने रिचर्ड ग्लीसनचा संघात समावेश केल्याचे जाहीर केले आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने इंग्लंडकडून 6 सामने खेळले आहेत आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, कॉनवेच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा रचिन रवींद्र कर्णधार गायकवाडसह डावाची सुरुवात करत असून तो आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. आता रिचर्ड ग्लीसनच्या आगमनानंतर चेन्नई सुपर किंग्जला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करायचे आहे की नाही हे पाहायचे आहे.
ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. संघाचे 8 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. उरलेल्या सामन्यांमध्ये संघ कसा खेळ करतो हे पाहायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.