IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Dhruv Jurel Video: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर ध्रुव जुरेलने कुटुंबासमवेत सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे.
Dhruv Jurel | Rajasthan Rotals | IPL 2024
Dhruv Jurel | Rajasthan Rotals | IPL 2024X/IPL
Updated on

IPL 2024, LSG vs RR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला 7 विकेट्सने पराभूत केले. हा राजस्थानचा 9 सामन्यांतील 8 विजय होता.

राजस्थानच्या विजयात कर्णधार संजू सॅमसनबरोबरच युवा क्रिकेटपटू ध्रुव जुरेलनेही मोलाचे योगदान दिले. दरम्यान, या सामन्यानंतर त्याने त्याचा आनंद त्याच्या कुटुंबासमवेत साजरा केला.

या सामन्यात राजस्थानसमोर लखनौने 197 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 78 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. अशा वेळी जुरेलला 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळाली, ज्याचा फायदा त्याने उचलला.

त्याने सॅमसनसह नाबाद 121 धावांची भागीदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. या दरम्यान त्याने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

Dhruv Jurel | Rajasthan Rotals | IPL 2024
IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

दरम्यान, या सामन्यासाठी जुरेलचे कुटुंबिय देखील एकाना क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होते. त्यामुळे जुरेलने त्याचा आनंद त्याच्या कुटुंबियांबरोबर साजरा केला आहे.

आयपीएलने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दिसते की सामन्यानंतर त्याचे कुटुंबिय मैदानात आले होते, यावेळी त्यांनी त्याला घट्ट मिठी मारत त्याचे कौतुक केले. त्याच्याही चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्ट दिसत होता.

या सामन्याआधी जुरेलला आयपीएलच्या 17 व्या हंगामात फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नव्हती. पण या सामन्यात तो पाचव्याच क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

Dhruv Jurel | Rajasthan Rotals | IPL 2024
CSK vs SRH IPL 2024 : हंगामातील दोन हेवी वेट चॅम्पियन भिडणार; सीएसके डबल डिजीटमध्ये जाणार की हैदराबाद दुसरं स्थान पटकावणार?

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर राजस्थानकडून जुरेल व्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसनने 33 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 71 धावांची खेळी केली.

त्यामुळे राजस्थानने 197 धावांचे लक्ष्य 3 विकेट्स गमावत 19 व्या षटकातच पूर्ण केले. लखनौकडून गोलंदाजीत यश ठाकूर, मार्कस स्टॉयनिस आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या होत्या. लखमौकडून केएल राहुलने 75 धावांची आणि दीपक हुड्डाने 50 धावांनी अर्धशतकी खेळी केली. राजस्थानकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.