Dinesh Karthik Retirement IPL 2024 : भारताचा माजी फलंदाज आणि विकेटकिपर दिनेश कार्तिक लवकरच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकार्दीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल हंगामानंतर दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
सध्या आरसीबीकडून खेळणाऱ्या 38 वर्षाचा दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएल खेळत आहे. त्याने सर्व 16 हंगाम खेळले असून या दरम्यान त्याने फक्त 16 व्या सत्रात दोन सामने खेळले नव्हते. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुासर दिनेश कार्तिकचे IPL 2024 हे शेवटचे आयपीएल सत्र असणार आहे. या आयपीएल हंगामानंतर दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.
आयपीएल सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून दिनेश कार्तिककडे पाहिले जाते. त्याने आतापर्यंत 6 आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सर्वात पहिल्यांदा दिनेश कार्तिक हा 2008 मध्ये दिल्ली डेयरडेविल्स (आता कॅपिटल्स) कडून खेळला होता. त्यानंतर 2011 मध्ये तो किंग्स इलेवन पंजाब (आता पंजाब किंग्स) कडून खेळला.
दिनेश कार्तिक 2012 आणि 13 चा हंगाम मुंबई इंडियन्स कडून खेळल्यानंतर 2014 मध्ये पुन्हा 12.5 करोड रुपये एवढी मोठी बोली घेत दिल्लीत परतला. मात्र तिथे तो एक हंगामच खेळला. त्यानंतर रॉयल चैलेंजर्स बेंगलोरने त्याला 2015 मध्ये 10.5 करोड रुपये देत आपल्या संघात घेतले. तिथेही दिनेश कार्तिक एक हंगामाच टिकला.
तो पुन्हा 2016 आणि 2017 मध्ये गुजरात लायंसकडून खेळला. अखेर 2017 पासून तो सलग चार हंगाम कोलकाता नाइटराइडर्सकडून खेळला.
केकेआरचे नेतृत्व करताना दिनेश कार्तिकने 2018 मध्ये संघाला प्ले ऑफमध्ये पोहचवलं. त्यानंतर 2019 मध्ये केकेआर पाचव्या स्थानावर राहिली. 2022 च्या हंगामापूर्वी केकेआरने त्याला रिलीज केलं. त्यानंतर आरसीबीने त्याला साडेपाच कोटी रूपयात आपल्या संघात सामावून घेतलं. तो आरसीबीमध्ये आता मॅच फिनिशरची भुमिका निभावतोय.
त्याने 2022 मध्ये 16 सामन्यात 55 च्या सरासरीने 183.33 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर त्याला 2022 च्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देखील मिळालं. मात्र अपेक्षेप्रमाणे त्याला कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.