Dwayne Bravo CSK : एप्रिल फूल दिवशी अंदाज वर्तवतात वाटतं... ब्राव्होने सीएसकेला डावलणाऱ्या 'जाणकारां'ना काढला चिमटा

Dwayne Bravo CSK
Dwayne Bravo CSKesakal
Updated on

Dwayne Bravo CSK : चेन्नई सुपर किंग्जने अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करत थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे आतापर्यंत 14 हंगाम खेळले आहेत. त्यांना दोन हंगामात बंदीचा सामना करावा लागला होता. या 14 हंगामात चेन्नईने तब्बल 12 वेळा प्ले ऑफ फेरी गाठली आहे. चेन्नईने यंदाच्या आयपीएल 16 व्या हंगामात देखील 17 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. ते आता गुजरात टायटन्सविरूद्ध चेन्नईत पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहेत.

Dwayne Bravo CSK
Akash Madhwal MI vs SRH : W,W,W,W आकाशनं मुंबईच्या आशा ठेवल्या जिवंत नाहीतर विवरांत - मयांक जोडीने तर...

चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या दोन संघात स्थान मिळवल्यानंतर संघाचा गोलंदाजी कोच आणि माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होने स्टार स्पोर्ट्सच्या जाणकार मंडळींना कचकटून चिमटा काढला. स्टार स्पोर्ट्सच्या समालोचकांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले दोन संघ कोणते असतील याची भविष्यवाणी करताना चेन्नई सुपर किंग्जने नावच घेतले नव्हते. यावरूनच ब्राव्हो आता या जाणकारांना ट्रोल करत आहे.

Dwayne Bravo CSK
IPL 2023 : …तर धोनीची CSK फायनल खेळणार! 'हा' योगायोग ठरणार महत्वाचा

ब्राव्होने इन्स्टाग्रामवर इरफान पठाण, एस. श्रीसंत, मोहम्मद कैफ, डेविड हसी, डेरेन गंगा, संजय मांजरेकर आणि मिताली राज यांनी निवडलेल्या पहिल्या दोन संघांची यादीच प्रसिद्ध केली. यापैकी एकाही जाणकाराने सीएसके यंदाच्या हंगामात पहिल्या दोन संघात स्थान मिळणवेल असे म्हटले नव्हते.

यावरून ब्राव्होने 'या सर्व भविष्यवाणी एप्रिल फूलच्या दिवशी केलेल्या दिसतात. चेन्नई 12 वेळा प्ले ऑफमध्ये पोहचली आहे. 9 फायनल खेळली असून चारवेळा विजेतेपद पटकावले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()