IPL 2024 Schedule : वनडे वर्ल्डकप संपताच आता भारतात आयपीएल 2024 चं बिगुल वाजायला सुरूवात झाली आहे. नुकतेच सर्व संघांची रिटेंशन प्रक्रिया पार पडली असून 19 डिसेंबरला दुबईत मिनी लिलाव होणार आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
मात्र यंदाची आयपीएल भारतातच होणार की लोकसभा निवडणुकीमुळे ती विदेशात हलवावी लागणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बीसीसीआय तर आयपीएल भारतातच खेळवण्याबाबत आग्रही दिसतंय.
मात्र आयपीएलचं वेळापत्रक हे निवडणूक आयोगाच्या एका परिपत्रकावर अवलंबून असणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील निवडणूक आयोगाच्या घोषणेची वाट पाहत आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतरच आयपीएल पूर्णपणे भारतात खेळवणे शक्य आहे की नाही हे स्पष्ट होईल.
आयपीएल आणि लोकसभा निवडणूक क्लॅश होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2009, 2014 मध्ये देखील लोकसभा निवडणूक आणि आयपीएल क्लॅश झालं होतं. त्यावेळी आयपीएल विदेशात हलवण्यात आलं होत. मात्र 2019 चा आयपीएल हंगाम हा निवडणूक असूनही भारतातच खेळवण्यात आला होता.
आयपीएल 2024 चं संभाव्य वेळापत्रक हे मार्च 24 ते मे 26 दरम्यान असण्याची शक्यता आहे. आयसीसी टी 20 वर्ल्डकप हा 4 जून पासून वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये सुरू होत असून तो 30 जूनपर्यंत संपणार आहे. त्यामुळे देखील आयपीएलचे वेळापत्रक तयार करणे अजूनच क्लिष्ट झालं आहे.
बीसीसीआयवर आयपीएल हे टी 20 वर्ल्डकपपूर्वी एक आठवडा आधी तरी संपवण्याचा दबाव असणार आहे. कारण सर्व देशांना वर्ल्डकपूर्वी तयारीला एक आठवडा तरी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.