IPL 2024 RCB coach Andy Flower : सात सामन्यांत सहा पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर आमच्यासाठी उरलेले सात साखळी सामने उपांत्य फेरीसारखे आहेत, असे मत बंगळूर संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी व्यक्त केले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात झालेला पराभव बंगळूर संघासाठी प्रामुख्याने त्यांच्या गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरण करणारा होता.
अधिक जोमाने पुनरागमन करू शकतो हा विश्वास आहे; मात्र त्यासाठी प्रत्येक सामना उपांत्य फेरीसारखा असल्याप्रमाणे खेळावे लागेल, असे फ्लॉवर म्हणाले. बंगळूरची सुमार गोलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक २८७ धावा त्यांच्याविरुद्ध फटकावण्यात आल्या.
हा सामना आमच्यासाठी फारच आव्हानात्मक होता. एवढ्या अधिक धावा देऊनही हा सामना आम्ही केवळ २५ धावांनी गमावला, ही त्यातल्या त्यात समाधान देणारी बाब आहे. असे सांगताना फ्लॉवर यांनी दिनेश कार्तिक आणि कर्णधार फाफ डुप्लेसी यांचे कौतुक केले. कार्तिकने ३५ चेंडूत ८३; तर फाफने २८ चेंडूत ६२ धावा फटकावल्या.
२८८ धावांचे लक्ष्य पार करणे जवळपास अशक्य होते; तरीही आमच्या फलंदाजांनी धैर्य खचू दिले नाही. जमेल तेवढा प्रतिहल्ला करून व्हानाचा पाठलाग कायम ठेवला. त्यामुळे सामना गमावला असला, तरी आत्मविश्वास कायम ठेवला. त्याचा पुढच्या सामन्यांत निश्चितच फायदा होईल, असे फ्लॉवर यांनी सांगितले.
दिनेश कार्तिकने अंतिम टप्प्यात भलतीच आक्रमक फलंदाजी केली. एकूणच तो चांगल्या फॉर्मात खेळत आहे. त्यामुळे येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, तर आश्चर्य वाटू नये, असे फ्लॉवर म्हणाले. बंगळूरचा पुढील सामना बलाढ्या कोलकता संघाविरुद्ध ईडन गार्डन येथे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.