IPL 2024, MI vs RR: स्टेडियमची सुरक्षा तर तोडलीच, पण मैदानात घुसत चाहत्याने रोहितलाही घाबरवलं, पाहा नक्की झालं काय?

Rohit Sharma Fan: वानखेडे स्टेडियमवर एका प्रेक्षकाने अचानक मैदानात घुसत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला घाबरवलं होतं.
Rohit Sharma Fan | Mumbai Indians | IPL 2024
Rohit Sharma Fan | Mumbai Indians | IPL 2024Sakal
Updated on

Rohit Sharma Fan: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे रोहित शर्माही घाबरला.

झाले असे की या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्ससमोर 126 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग राजस्थान करत असताना मुंबईकडून रोहित स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी एक प्रेक्षक अचानक स्टेडियमची सुरक्षा तोडत अचानक मैदानात घुसला.

Rohit Sharma Fan | Mumbai Indians | IPL 2024
IPL 2024 : MS धोनीमुळे CSK टेन्शनमध्ये! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर दिसला लंगडताना; Video Viral

मैदानात घुसल्यानंतर तो थेट रोहित शर्माच्या दिशेने गेला. त्यावेळी रोहितचे लक्ष त्याकडे नव्हते. त्यामुळे तो प्रेक्षक अचानक जवळ येताच रोहित घाबरला आणि दूर झाला. त्यानंतर तो प्रेक्षक त्याला भेटला.

त्या प्रेक्षकाने यष्टीरक्षण करणाऱ्या इशान किशनचीही भेट घेतली आणि तो मैदानातून बाहेर जात असताना त्याचवेळी सुरक्षा कर्मचारी मैदानात येत होते. त्यांनी नंतर त्याला बाहेर नेले.

दरम्यान, चाहत्याने स्टेडियमची सुरक्षा मोडत मैदानात घुसण्याची आयपीएल २०२४ मधील ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात झालेल्या सामन्यादरम्यानही विराट कोहलीला भेटण्यासाठी एक प्रेक्षक थेट मैदानात घुसला होता.

तसेच यापूर्वीही अनेकदा भारतात खेळाडूंना भेटण्यासाठी प्रेक्षकांनी सुरक्षा तोडत मैदानात घुसण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही सातत्याने उपस्थित राहत आहे.

Rohit Sharma Fan | Mumbai Indians | IPL 2024
IPL 2024, MI vs RR: वानखेडेवर हार्दिकला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना पाहून रोहितनं काय केलं? Video होतोय व्हायरल

मुंबईचा पराभव

सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 125 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 34 धावा केल्या. तसेच तिलक वर्मान 32 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजी करताना राजस्थानने 15.3 षटकात 4 बाद 127 धावा करत 126 धावांचे आव्हान पार केले. राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक 54 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.