IPL 2023 Jio Cinema App crashes : इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. एमएस धोनी ब्रिगेडची सुरुवात खूपच खराब झाली. आयपीएल 2023च्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कंपनीने त्यांना पाच विकेटने पराभव केले.
आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यात चाहत्यांना काही काळ निराश व्हावे लागले. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान जिओ सिनेमाचे अॅप काही काळासाठी क्रॅश झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली.
आयपीएल 2023 चा उद्घाटन सामना GT आणि CSK यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवर जिओ सिनेमाला खूप ट्रोल केले. यासोबत चाहत्यांनी जिओ क्रॅश हा हॅशटॅग वापरला आहे. चाहत्यांना अॅप क्रॅश आणि बफरिंग समस्यांचा सामना करावा लागला. यानंतर जिओ सिनेमानेही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2023 यावेळीस चाहत्यांना एक अतिरिक्त बोनस मिळाला आहे, कारण ते स्पर्धेतील सर्व सामने विनामूल्य पाहू शकतील. मात्र पहिल्याच सामन्यात लाखो वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सलामीच्या सामन्यादरम्यान जिओ सिनेमा अॅप क्रॅश झाला. यामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे कारण त्यांना IPL 2023 चा पहिला सामना थेट पाहण्यात अडचण आली.
Viacom त्याच्या OTT Jio सिनेमावर IPL 2023 चे विनामूल्य स्ट्रीमिंग करत आहे. रिलायन्सने एकूण 23,758 कोटी रुपयांमध्ये IPL प्रसारण अधिकार (2023-2027 साठी) विकत घेतले आहेत.
स्ट्रीमिंग डिस्ने स्टारने भारतीय टेलिव्हिजनचे हक्क संपादन करण्यासाठी 23,575 कोटी रुपये दिले आहेत. प्रथमच दोन्ही कंपन्या भारत आणि इतर प्रदेशातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सामने प्रसारित करत आहेत.
जिओ सिनेमाने ट्विट केले की, "आम्हाला या समस्येबद्दल खेद वाटतो. हाय! कृपया अॅप पुन्हा स्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा. समस्या कायम राहिल्यास, डिव्हाइसचे तपशील, OS आवृत्ती, ‘सेटिंग्ज’ टॅब/ ‘अधिक’ टॅबची प्रतिमा/स्क्रीनशॉट आणि आमच्या तपासणीसाठी त्रुटीचा एक छोटा व्हिडिओ DM करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.