Video : जम्मूच्या पोराचा वेग वाढतोय! 153.3 kmph स्पीडचा नवा रेकॉर्ड

Umran Malik Fastest Ball in IPL 2022
Umran Malik Fastest Ball in IPL 2022Sakal
Updated on

Fastest Ball in IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जम्मू काश्मीरचा पठ्य़ा आपल्या चेंडूतील वेगाची झलक दाखवून देताना दिसतोय. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकनं (Umran Malik) आपल्याचं रेकॉर्डमध्ये सुधारणा करत यंदाच्या हंगामातील सर्वात जलद गतीचा चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) या गोलंदाजाने जवळपास 150 kmph पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकले. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात गुजरात विरुद्ध त्याने 153. 3 kmph इतक्या वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा तो सर्वात जलद गतीचा चेंडू ठरलाय. (Fastest Ball in IPL 2022 Umran Malik Clocks 153.3 kmph During SRH vs GT Match)

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 7 व्या षटकात केन विल्यमसन याने भारताच्या नवोदित जलदगती गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला. आपल्या स्पेलमधील पहिलाच चेंडू त्याने बाउन्सर फेकला. हा चेंडू हार्दिक पांड्याच्या हेल्मेटवर जोरात आदळल्याचे पाहायला मिळाले. पुढे कोणी असला तरी वेग कमी होणार नाही तर त्यात आणखी भर घालणार याचे संकेतच त्याने हा चेंडू फेकून दिले. सातत्याने तो 150 किमीप्रति तास पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकताना पाहायला मिळाले.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकनं 4 षटकात 39 धावा खर्च करुन 1 विकेट घेतली. आपल्या स्पेलमध्ये त्याने 5 धावा या वाईडच्या स्वरुपात दिल्या. पण सर्वांचे लक्ष वेधलं ते त्याच्या गतीने. जम्मू काश्मीरचा हा गोलंदाज सुरुवातीपासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसते. यंदाच्या मेगा लिवावाआधी हैदराबाद संघाने वेगाच्या नवाबावर विश्वास दाखवून त्याला रिटेन केले होते. त्याच्यासाठी संघाने 4 कोटी मोजले आहेत. यंदाच्या हंगामात नॉर्तजे आणि रबाडा यांच्या वेगापेक्षा त्याच्या गोलंदाजीच्या गतीची चर्चा सुरु असणे हे भारतीय क्रिकेटमध्ये जलगती गोलंदाजाचे अच्छे दिन आल्याचे फिल देणारेच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()