IPL 2023 FICA Raise wages Issue : आयपीएल ही जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात श्रीमंत टी 20 लीग आहे. या लीगमध्ये भारतीय तसेच विदेशी खेळाडू कोटीच्या कोटी उड्डाणे प्रत्येक लिलावात घेत असतात. मात्र ही कोटीच्या कोटी उड्डाणे खेळाडूंच्या जागतिक संघटनेला फारच खुजी वाटत आहे. यासाठीच त्यांनी बीसीसीआयला आयपीएल स्टार्सचा पगार वाढवण्याची विनंती केली आहे. जरी विराट कोहली, सॅम करन, केएल राहुल यासारख्या स्टार खेळाडूंना जरी करोडो रूपये मिळत असले तरी आयपीएलच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त 17 टक्केच रक्कम ही खेळाडूंवर खर्च होत आहे. दुसरीकडे प्रीमियर लीगमध्ये हे प्रमाण जवळपास 71 टक्के इतके आहे.
FICA या खेळाडूंची जागतिक संघटनेने आयपीएलमधील खेळाडूंच्या पगारावर खर्च होणारी रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार आयपीएल एका हंगामात जेवढी कमाई करते त्याच्या फक्त 18 टक्के रक्कम ही खेळाडूंना मिळते. ही आकडेवारी प्रीमियर लीग आणि एनएफएल स्टार्सच्या तुलनेत फार कमी आहे.
याबाबत टॉम मॉफॅट यांनी टेलिग्राफ स्पोर्ट्सला सांगितले की, 'खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास खूप आवडते. मात्र जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर आयपीएलमध्ये खेळाडूंना आयपीएलच्या एकूण उत्पन्नाच्या फार कमी टक्के रक्कम मिळते. इतर खेळाडूंच्या लीगच्या तुलनेत ही फारच कमी आहे. आम्ही आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीग अशीच यशस्वी होत रहावी आणि खेळाडूंना देखील त्यातील योग्य वाटा मिळावा यासाठी आग्रही असणार आहे.'
आयपीएलबाबत बोलायचं झालं तर बीसीसीआयकडून सर्व 10 फ्रेंचायजींना IPL 2023 च्या हंगामात जवळपास 490 कोटी रूपये उत्पन्न मिळणार आहे. बीसीसीआय देखील एकूण उत्पन्नाच्या 50 टक्के उत्पन्न आपल्याकडे ठेवते. फ्रेंचायजी याशिवाय जवळपास 50 कोटी रूपये हे तिकीट, स्पॉन्सरशिप आणि टी शर्ट विक्रीतून कमवते. फ्रेंचायजींना जवळपास 500 कोटी रूपये उत्पन्न मिळते. त्यातील फक्त 95 कोटी रूपये हे खेळाडूंच्या पगारासाठी वापरले जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.