IPLमध्ये खेळाडूंना मिळणार ७.५ लाख रुपये मॅच फी, जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा

BCCI secretary Jay Shah big announcement about IPL Match Fees: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी जय शाह यांनी खेळाडूंच्या मॅच फीबाबत मोठी घोषणा केली आहे.
Jay Shah | IPL 2025 Match Fees
Jay Shah | IPL 2025 Match FeesSakal
Updated on

Jay Shah announced match fee of INR 7.5 lakhs from IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यातच आता बीसीसीयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.

जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे की यापुढे आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना ७.५ लाख रुपये सामना शुल्क (Match Fees) म्हणून दिले जाणार आहेत. तसेच जे खेळाडू लीगमधील सर्व सामने खेळणार आहेत त्यांना त्यांच्या कराराव्यतिरिक्त १.०५ कोटी अतिरिक्त दिले जाणार आहे.

त्यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला १२.६० कोटी रुपये एका हंगामासाठी सामना शुल्कासाठी मंजूर करण्यात आले आहेत. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.

Jay Shah | IPL 2025 Match Fees
IPL 2025 मध्ये ३ खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर सांगू शकतात दावा, दोन नावं तुम्हाला माहित आहेत...

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वाची बैठक शनिवारी (२८ सप्टेंबर) पार पडली असल्याचे समजत आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. आगामी आयपीएल हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावाच्यादृष्टीनेही ही बैठक महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलच्या बैठकीत सर्व १० फ्रँचायझींना जास्तीत जास्त ५ खेळाडूंना संघात कायम करण्याची, तसेच यंदाच्या लिलावात एक राईट टू मॅच कार्डही वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला असू शकतो.

राईट टू मॅच कार्ड वापरून फ्रँचायझींना किमान एका खेळाडूला पुन्हा संघात घेता येणार आहे. त्याचबरोबर यंदा फ्रँचायझीच्या पर्समधील पैशांची मर्यादाही वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

Jay Shah | IPL 2025 Match Fees
IPL Player Retention 2025: हार्दिक, सूर्या, बुमराह...! मुंबई इंडियन्सचं चित्र स्पष्ट, जाणून घ्या अन्य ९ संघाचे ते पाच खेळाडू कोण

यापूर्वी २०१८ आयपीएलच्या लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरण्यात आले होते. तसेच जर मेगा ऑक्शनआधी ५ खेळाडूंना कायम करण्याची परवानगी जर देण्यात आली, तर असं पहिल्यांदाच होईल.

यापूर्वी २०२२ मध्ये मेगा ऑक्शनपूर्वी केवळ ४ खेळाडूंना कायम करण्याची परवानगी होती. तसेच २०१८ च्या मेगा ऑक्शनमध्ये ३ खेळाडूंना कायम करता येणार होते, तर २ खेळाडूंसाठी राईट टू मॅच कार्डचा पर्याय होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.