Gautam Gambhir RCB vs KKR : जिंकलं तर काही नाही मात्र... गंभीरनं किंगला डिवचलं; सांगितलं RCB लाच का हरवायचं आहे?

Gautam Gambhir virat kohli
Gautam Gambhir virat kohli esakal
Updated on

Gautam Gambhir Big Statement About RCB : आयपीएलचा 10 वा सामना आज बेंगलुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आरसीबी आज होम ग्राऊंडवर केकेआरशी पंगा घेणार आहे. या सामन्याकडे केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर अन् आरसीबीचा किंग विराट कोहली यांच्यातील टसल म्हणून देखील पाहिलं जात आहे. दरम्यान, आधीच हाय व्होल्टेज असलेल्या या सामन्याचं व्होल्टेज गौतम गंभीरनं किंग कोहली अन् त्याच्या संघाला डिवचून वाढवलं आहे.

Gautam Gambhir virat kohli
IPL मधील नियमामुळे पाँटिंग-गांगुलीचा पंचांशीही वाद, RR vs DC सामनाही अचानक थांबला; जाणून घ्या नक्की झालं काय?

गौतम गंभीरने केकेआर विरूद्ध आरसीबी सामन्यापूर्वी एक मोठं वक्तव्य केलं आहे. गौतम गंभीर म्हणतो की, 'मला एका संघाला स्वप्नात देखील मला पराभूत करावंस वाटतं तो संघ म्हणजे आरसीबी! हा संघ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात हाय प्रोफाईल आणि फ्लेमबॉयंट संघ आहे. संघापासून मालकांपर्यंत सगळे स्टार आहेत.'

'क्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स. खरं सांगू का त्यांनी काही जिंकलेलं नाही. मात्र ते विचार करतात की त्यांनी सगळं जिंकलंय!'

Gautam Gambhir virat kohli
MS Dhoni Video: 'ऋतुराज माझ्यासारखाच...', रचिन रविंद्रला विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं उत्तर

केकेआरने देखील विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील राव्हलरीला हवा दिली आहे. गंभीर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर असताना विराट अन् गंभीरची मैदानावर बाचाबाची झाली होती. आता गंभीर केकेआरचा मेंटॉर आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमवर गंभीर अन् विराट कोहली हे एकाच फ्रेममध्ये दिसत होते. केकेआरने हा फोटो शेअर करत त्याला, 'क्रिकेटमधील काही फोटो जे जोरदार धक्का देतात.' असं कॅप्शन दिलं.

Gautam Gambhir virat kohli
IPL 2024: 16 वर्षीय खेळाडूची KKR संघात एन्ट्री, केशव महाराजलाही मिळाली 'या' संघात संधी

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आरसीबी आणि केकेआरने यंदाच्या आयपीएलमधील एक-एक सामने जिंकले आहेत. आरसीबीची सुरूवात पराभवाने झाली होती. सीएसकेने त्यांना पहिल्याच सामन्यात मात दिली. त्यानंतर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आरसीबीने पंजाब किंग्जचा 4 विकेट्सनी पराभव करत विजयाचे खाते उघडले होते.

केकेआरने देखील घरच्या मैदानावर खेळत सनराईजर्स हैदराबादला अवघ्या 4 धावांनी मात देत पहिला विजय साकारला होता. आज केकेआर घरच्या मैदानावर नाही तर आरसीबीच्या बालेकिल्ल्यात खेळणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात झालेल्या 9 पैकी 9 सामन्यात होम टीमने बाजी मारली आहे. आज केकेआर हा सिलसिला तोडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.